शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मकरंदवाडी सोसायटीत गैरव्यवहार

By admin | Updated: June 29, 2014 00:46 IST

मकरंदवाडी सोसायटीत गैरव्यवहार

 नाशिक : देवळा तालुक्यातील मकरंदवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत झालेल्या बोगस कर्जवाटप प्रकरणांबाबत देवळा येथील सहायक निबंधक कार्यालयासमोर सोसायटीच्या विद्यमान संचालकांसह संस्थेच्या सभासदांनी सुरू केलेले उपोषण सहायक निबंधकांनी १५ दिवसांच्या आत योग्य ती चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले.निवेदनात म्हटल्याप्रमाणे गत ५ ते ६ वर्षांपासून मकरंदवाडी वि.का. सोसायटीत मोठ्या प्रमाणात बोगस कर्जवाटप करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी व संचालक मंडळाने संगनमताने आठ ते नऊ फार्म हाऊससाठी कर्जवाटप केले आहे. प्रत्यक्षात तिथे कोणतेही फार्म हाऊसचे बांधकाम झालेले नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. फार्म हाऊससाठी दिलेले लाखो रुपयांचे कर्ज आज रोजी थकबाकीत असल्याने संस्था तोट्यात आहे. संस्थेच्या काही संचालकांकडे इतर बँकांचे कर्ज असताना संचालक मंडळाने त्यांच्या संचालक मंडळीच्या सदस्यांना संस्थेचे दुहेरी कर्ज दिलेले आहे. या सर्व कारणांमुळे संस्था मोठ्या प्रमाणात थकबाकीत आहे. नियमित कर्जवाटपामुळे संस्था बंद पडावयाच्या स्थितीत आहे. मागील पाच ते सहा वर्षांत वाटप झालेल्या सर्व मध्य मुदत व पीककर्जाची चौकशी करून संबंधित बँक अधिकारी व संचालक मंडळावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रति जिल्हा उपनिबंधक, नाशिक, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक, सहायक निबंधक, देवळा आदिंना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, २ जून रोजीवरील निवेदनाच्या प्रति संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने मकरंदवाडी सोसायटीचे संचालक उद्धव अहेर, संस्थेचे सभासद दशरथ पूरकर, भाऊसाहेब भदाणे, कारभारी अहेर, भालचंद्र अहेर, पंडित पगार आदिंनी सोमवारी (दि. २३) सहायक निबंधक कार्यालय, देवळा येथे उपोषण सुरू केले. अखेर सहायक निबंधक, देवळा यांनी १५ दिवसांच्या आत बोगस कर्ज प्रकरणाची चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे.