शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ जखमी : राखीव वनात ट्रेकिंग करताना बिबट्यासोबत भेट घडते तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 16:49 IST

पांडवलेणीचा परिसर राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित आहे. येथील पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाचे संपूर्ण क्षेत्र जे पांडवलेणी डोंगराच्या पाठीमागील बाजूने पायथ्याला लागून आहे.

ठळक मुद्देट्रेकर्स ग्रुपचे ‘पिकॉक’ असे नाव आहे. बिबट्याला धोक्याची जाणीव झाल्याने त्याने चाल केली असावी

नाशिक :पांडवलेणी परिसरातील राखीव वनक्षेत्र घोषित असलेल्या डोंगरावर विनापरवाना ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका तीस वर्षीय युवकावर बिबट्याने चाल क रत पंजा मारला. मात्र वेळीच सावध झालेला तरुण आणि चढावरून तोल गेल्याने बिबट्या खाली घसरल्यामुळे ट्रेकर्स थोडक्यात वाचला.याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, पांडवलेणीचा परिसर राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित आहे. येथील पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानाचे संपूर्ण क्षेत्र जे पांडवलेणी डोंगराच्या पाठीमागील बाजूने पायथ्याला लागून आहे. हा संपूर्ण परिसर वनविकास महामंडळाच्या अखत्यारित येतो. तसेच डोंगरावरील झाडांचे क्षेत्र हे राखीव वन आहे. यामुळे या भागात ट्रेकिंगसाठी जाण्यापूर्वी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक ठरते; मात्र काही उत्साही ट्रेकर्स डोंगराच्या पाठीमागून ट्रेकिंगच्या नावाखाली विनापरवाना चढाई करतात. गणेश पांडुरंग पानसरे (३०, रा. साईबाबानगर, सिडको) हा आपल्या काही मित्रांसोबत गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ट्रेकिंग करण्यासाठी पांडवलेणी डोंगरावर चढाई करू लागला. दरम्यान, त्याच्यासोबत असलेले अन्य मित्र हे डोंगराच्या पायथ्याशी थांबून होते. त्यांच्या ट्रेकर्स ग्रुपचे ‘पिकॉक’ असे नाव आहे. पानसरे हा डोंगराच्या मध्यापर्यंत पोहचल्यानंतर कपारीत दडून बसलेल्या बिबट्याला धोक्याची जाणीव झाल्याने त्याने चाल केली असावी, असे सूत्रांनी सांगितले. सुदैवाने बिबट्याच्या या हल्ल्यात पानसरे बचावला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

टॅग्स :NashikनाशिकPandav cavesपांडवलेणीleopardबिबट्याforest departmentवनविभाग