शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:34 IST

टाकळीतील गरीब कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीला एकाने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देएकाविरुद्ध गुन्हा ; ठार मारण्याची धमकी

नाशिकरोड : टाकळीतील गरीब कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीला एकाने लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करून ठार मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.आई-वडिलांसमेवत या मुलीने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तिचा आशय असा की मुलगी परिसरातील शाळेत आठवीत असताना सनी कैलास म्हस्के (रा. गांधीनगर) हा तिला भेटायला येत असे. दोघांची मैत्री झाली. म्हस्के मुलीला गोड बोलून लग्नाचे आश्वासन देत जवळीक साधत होता. नकार दिल्यावर म्हस्के लग्नाचे आश्वासन देत जबरदस्तीने अत्याचार करत असे. २ जून १९ रोजी दुपारी बाराला मुलगी मैत्रिणीकडून शिवण क्लास संपवून घरी पायी जात असताना म्हस्केने तिला गाठले. लग्नाबद्दल बोलायचे आहे असे सांगून पुन्हा गांधीनगरमधील पडीक इमारतीत घेऊन गेला. मुलीने नकार दिल्यानंतर म्हस्केने सांगितले की, माझ्या मोबाइलमध्ये तुझे अश्लील फोटोचे रेकार्डिंग आहे. मी तुझी बदनामी करीन. म्हस्केने पीडितेवर बलात्कार केला व तिला तिच्या घराजवळ सोडले.या घटनेनंतर म्हस्केने चार दिवसांनी मुलीला फोन करून आपले लग्न ठरल्याचे सांगितले. मला विसरून जा, माझ्या लग्नात अडथळा आणू नको, अन्यथा बदनामी करीन असा दमही दिला. ११ जुलैला म्हस्केच्या शेजारी राहणाऱ्या मुलाने पीडित मुलीला म्हस्केचे लग्न झाल्याचे सांगितले. मुलीने त्याच्या घरी जाऊन जाब विचारला असता म्हस्केने तिला बदनामी करण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. झाले गेले विसरून जाण्याचा सल्ला दिला. मुलीने आई-वडिलांना सदर प्रकार सांगितला. तसेच त्यांच्यासमवेत उपनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRapeबलात्कार