शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलगी विनयभंग प्रकरणी सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 16:07 IST

नाशिक : शिकवणीहून परतत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबियाना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी सुरेश विश्राम अहिरे (२५, रा़ शिवाजीनगर, कार्बन नाक्यामागे, सातपूर) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शुक्रवारी (दि़२८) तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील शिरीष कडवे यांनी या खटल्यात चार साक्षीदार तपासले़

ठळक मुद्दे विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा पिडीत मुलीस सहा महिन्यात न्याय

नाशिक : शिकवणीहून परतत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबियाना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी सुरेश विश्राम अहिरे (२५, रा़ शिवाजीनगर, कार्बन नाक्यामागे, सातपूर) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शुक्रवारी (दि़२८) तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील शिरीष कडवे यांनी या खटल्यात चार साक्षीदार तपासले़

सातपूर शिवाजीनगरमधील एका खासगी शिकवणीवरून २२ मार्च २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या घरी परतत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या पाठिमागून पळत येऊन आरोपी सुरेश अहिरे याने हात धरला़ या मुलीने त्याचा प्रतिकार केला असता या मुलीला शिवीगाळ करून तिचे वडील व भावास जीवे मारण्याची धमकी दिली होती़ तसेच महाविद्यालयात जाण्याच्या व परतीच्या मार्गावरील रस्त्यावर अहिरे हा पाठलाग करीत होता़ तसेच घराच्या गच्चीतून या मुलीकडे एकटक बघत असले़ यापुर्वी ३० जानेवारी २०१८ रोजी मद्य प्र्नाशन करून अहिरे याने मुलीच्या वडीलांना शिवीगाळ व मारहाणही केली होती़

या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा तपास सातपूरच्या महिला पोलीस उपनिरीक्षक सीक़े़देवरे, एस़एस़जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ सरकारी वकील शिरीष कडवे यांनी घेतलेल्या चार साक्षीदारांपैकी पिडीत मुलगी व तिचे वडील यांचा जबाब आरोपी अहिरेविरोधात गुन्हा सिद्ध होण्यास महत्वाचा ठरला़पिडीत मुलीस सहा महिन्यात न्यायसर्वोच्च न्यायालयाने महिला व अल्पवयीन मुलांवरील अत्याचारप्रकरणी दाखल पोस्कोच्या गुन्ह्यांमध्ये जलद सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार सातपूरच्या या घटनेतील पिडीतेस अवघ्या सहा महिन्यात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी निकाल दिला आहे़ सातपूर पोलीस ठाण्यातील महिला अधिकाऱ्यांनी केलेला तपास, न्यायालयात वेळेत दाखल केलेले दोषारोपपत्र व न्यायालयाने केलेली जलद सुनावणी यामुळे या घटनेतील पिडीतेस अवघ्या सहा महिन्यात न्याय मिळाला आहे़

टॅग्स :Courtन्यायालयNashikनाशिक