शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 17:37 IST

ग्रामविकासाची कामे ग्रामस्थ सुचवतील ती प्राधान्याने करावीत. कंत्राटदारांशी संगनमत करुन त्यांनी सुचविलेली कामे करु नका अशी तंबी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी वडनेर व वडेल येथे आले असता ते बोलत होते. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. चारा व पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सुजाणपणे नागरिकांनीच पुढाकार घ्यावा. गाळपेऱ्याच्या माध्यमातुन, चा-याच्या प्रश्नाची काहीअंशी सोडवणूक होऊ शकेल असेही भुसे यांनी सांगितले.

अजंग रावळगाव औद्योगिक वसाहतीसाठी संपादीत केलेली शेती महामंडळाची साडेआठशे एकर जमीन तसेच काष्टी शिवारातील शेती महामंडळाची हजार एकर जमीन हे मालेगाव तालुक्याला वरदान ठरणारे दोन महत्वकांक्षी प्रकल्प असून चाळीसगाव फाट्यावरील औद्योगिक वसाहतीनंतर अजंग रावळगाव औद्योगिक वसाहतीत बेरोजगार तरुणांना काम मिळणार आहे. रोजगार निर्मितीमुळे या भागाचा नक्कीच कायापालट होईल असा आशावादही यावेळी भुसे यांनी व्यक्त केला. वडनेर, खाकुर्डी, अजंग व वडेल ग्रामपंचायतीमार्फत भुसे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी भुसे यांच्या सोबत गटविकास अधिकारी पिंगळे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे यांच्यासह तहसिल कार्यालयातील अधिकारी, वीज मंडळ, महसुल विभाग, पाणलोट विभाग, ग्रामविकास अधिकारी आदि अधिकारी उपस्थित होते. यावेळी वडनेर, खाकुर्डी, कोठरे, विराणे, चिंचवे, वळवाडे,  अजंग, वडेल, पिंपळगाव, टिपे, संतनगर, डाबली आदि गावातील ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी संबंधित अधिका-यांकडून उत्तरे मिळवून दिली.

टॅग्स :droughtदुष्काळministerमंत्री