शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

किमान वेतनाचे घोंगडे पालिकेने झटकले

By admin | Updated: October 30, 2015 23:22 IST

कामगार उपायुक्ताकडे बोट : कारवाईची केली सूचना

नाशिक : घंटागाडी व पेस्ट कंट्रोल कामगारांना सुधारित किमान वेतनासह फरक द्यायचा की नाही आणि तो देय असूनही त्याची अंमलबजावणी होत नसेल तर संबंधित मक्तेदारांचे प्रबोधन अथवा कारवाई करण्याची सूचना महापालिकेने आता कामगार उपआयुक्त कार्यालयाला करत भिजत पडलेले घोंगडे झटकले आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे आता कामगार उपआयुक्त कार्यालयाच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. राज्य शासनाच्या औद्योगिक व कामगार मंत्रालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार सुधारित किमान वेतनाचे दर निश्चित करण्यात आले असून दि. २४ फेबु्रवारी २०१५ पासून फरकासह किमान वेतन अदा करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. या अधिसूचनेचा आधार घेत घंटागाडी व पेस्ट कंट्रोलच्या कामगारांनी किमान वेतनाची फरकासह मागणी केलेली आहे.कामगार कार्यालयांमध्ये विसंगतीमुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालयाने सफाई कामगार व मेहतर या उद्योगातील कामगारांना सन २०१० च्या अधिसूचनेनुसार किमान वेतन लागू असल्याचे पत्र महापालिकेला पाठविले आहे, तर नाशिकच्या कामगार उपआयुक्त कार्यालयाने घंटागाडी व पेस्ट कंट्रोलच्या कामगारांना सुधारित किमान वेतन देय असल्याचे म्हटले आहे. एकाच विभागातील दोन वेगवेगळ्या कार्यालयांकडून मिळालेल्या पत्रात विसंगती असल्याने पालिकेचा आरोग्य विभाग गोंधळून गेला आहे. अंमलबजावणी करायची तर कुणाची, या संभ्रमात सापडलेल्या पालिकेने अखेर कामगार उपआयुक्त कार्यालयावरच मक्तेदारांवर कारवाई अथवा प्रबोधनाची जबाबदारी सोपविली आहे. घंटागाडी कामगारांचे धरणेआरोग्य विभागाने दोन ते तीन दिवसात सुधारित किमान वेतन अदा करण्याचे आदेश मक्तेदारांना देऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने नाशिक महापालिका श्रमिक संघामार्फत घंटागाडी कामगारांनी महापालिकेसमोर शुक्रवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असून ते अधिक व्यापक करण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी दिली.