शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

थंडीचा कडाका : तपमानाचा पारा ९.४ अंशापर्यंत घसरला; हंगामातील नीचांकी नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:09 IST

हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ अद्याप नोंदविले गेले होते; मात्र मंगळवारी (दि.११) हा रेकॉर्ड ब्रेक झाला. पारा थेट ९.४अंशापर्यंत घसरल्याने राज्यातील सर्वाधिक कमी किमान तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले

ठळक मुद्दे दोन दिवसांपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणारकिमान तपमानाची नीचांकी नोंद प्रथमच नाशिकमध्येनाशिक महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंड शहर

नाशिक : हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तपमान १०.२ अद्याप नोंदविले गेले होते; मात्र मंगळवारी (दि.११) हा रेकॉर्ड ब्रेक झाला. पारा थेट ९.४अंशापर्यंत घसरल्याने राज्यातील सर्वाधिक कमी किमान तपमान नाशिकमध्ये नोंदविले गेले. नाशिकला थंडीचा कडाका वाढला असून पुढील दोन दिवस किमान तपमानात घसरण कायम राहणार असल्याने नाशिककरांना थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागणार आहे.राज्यात सोमवारी (दि.१०) सर्वाधिक कमी तपमानाची नोंद नाशिकमध्ये झाली होती. शहरात किमान तपमान १२.८ तर कमाल तपमानाचा पारा थेट २८.२ अंशापर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे सध्या राज्यात नाशिक महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंड शहर बनले आहे. मागील काही दिवसांपासून किमान तपमानाचा पारा कमी-जास्त होत असल्याचे थंडीची तीव्रतेतही फरक पडत होता; मात्र अचानकपणे या आठवड्यात हवामानात कमालीचा बदल झाला. गेल्या शनिवारी (दि.१) शहरात सर्वाधिक थंडीचा कडाका जाणवला. त्यादिवशी कमाल तपमानाचा पारा २६.१ अंशापर्यंत तर कि मान तपमान ११.२ अंशापर्यंत घसरले होते. त्यानंतर सातत्याने किमान तपमानासह कमाल तपमान सलग चार दिवस कमी राहिले. २८.२ अंशापर्यंत कमाल तपमान खाली घसरले होते. त्यानंतर पुन्हा कमाल तपमान वाढल्याने थंडीची तीव्रता कमी झाली होती; मात्र अचानकपणे ३१ अंशापर्यंत पोहचलेला कमाल तपमानाचा पारा थेट सोमवारी २८.२ अंशापर्यंत घसरला तर किमान तपमान १३.४ अंशावरून १२.२ अंशापर्यंत खाली आले. वातावरणात सोमवारी सकाळी ७६ टक्के इतके आर्द्रतेचे प्रमाण हवामान केंद्राकडून मोजण्यात आले. एकूणच हवामानात बदल झाला असून नागरिकांना हिवाळा चांगलाच अनुभवयास येऊ लागला आहे. राज्यात आतापर्यंत या हंगामात किमान तपमानाची नीचांकी नोंद प्रथमच नाशिकमध्ये झाली. निफाड तालुक्यात अचानकपणे पारा नऊ अंशापर्यंत सोमवारी घसरला होता. त्यामुळे तालुका गारठला असून, शेतकरी, ऊसतोड कामगारांनी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. ही थंडी गहू, कांदे या पिकांच्या दृष्टीने पोषक ठरणार आहे.थंडीचा कडाका वाढताच शहरात वाढत्या थंडीच्या तीव्रतेमुळे उबदार कपड्यांनाही मागणी वाढली आहे. स्वेटर, जॅकेट, टोपी, मफलर, हातमोजे, पायमोजे यांसारख्या उबदार कपड्यांच्या खरेदीवर नाशिककर भर देत आहेत. थंडी वाढल्यामुळे निफाडसह शहरी भागातदेखील रात्रीच्या शेकोट्या पेटू लागल्या आहेत. मंगळवारी सकाळी किमान तपमान अधिकच घसरले. पारा थेट ९.४अंशापर्यंत खाली आल्याने थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. सकाळी नाशिककर संपुर्णत: उबदार कपड्यांनी पॅक होऊनच घराबाहेर पडले.दोन दिवसांपर्यंत थंडीचा कडाकाशहराचे हवामान अचानकपणे बदलले असून येत्या दोन दिवसांपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार असून गुरूवारनंतर (दि.१३) किमान तपमानात १अंशाने वाढ होऊ शकते असा अंदाज मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे नाशिककरांना थंडीच्या तीव्रतेचा सामना गुरूवारपर्यंत करावा लागू शकतो. कमाल तपमान वाढल्यास काही अंशी वातावरणात उष्मा निर्माण होऊन थंडीपासून दिलासा मिळू शकेल असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमानweatherहवामान