शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दंड भरूनही गौणखनिजासाठी अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:26 IST

नाशिक तहसील कार्यालयाने शहराच्या विविध भागांत अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून नियमानुसार दंडाची भरपाई करून घेतली असली तरी, गेल्या तीन आठवड्यांपासून दंड भरूनही प्रांत अधिकाºयांकडून वाहने सोडली जात नसल्याने ऐन सणासुदीत व्यावसायिकांना प्रांत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.

नाशिक : नाशिक तहसील कार्यालयाने शहराच्या विविध भागांत अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून नियमानुसार दंडाची भरपाई करून घेतली असली तरी, गेल्या तीन आठवड्यांपासून दंड भरूनही प्रांत अधिकाºयांकडून वाहने सोडली जात नसल्याने ऐन सणासुदीत व्यावसायिकांना प्रांत कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.  ग्रामीण भागातून दगड, वाळू, मुरुमाची चोरी करून त्याची अवैध वाहतूक करणाºयांच्या विरोधात महसूल विभागाने मोहीम हाती घेतली आहे. नाशिक तहसील कार्यालयाने गेल्या महिन्यात अशाच स्वरूपात सहा ते सात वाहनांवर थेट कारवाई केली. कुठल्याही प्रकारचा परवाना नसतानाही गौणखनिजाची वाहतूक करणारे वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात आणून उभे करण्यात आले आहेत. शासनाच्या गौणखनिज विषयक नवीन धोरणानुसार अवैध वाहतूक करणाºया वाहनांकडून पाच पट दंड व एक लाख रुपये वाहन दंड अशी दुहेरी कारवाई करण्याच्या सूचना असल्यामुळे तहसील कार्यालयाने वाहनचालकांना नोटिसा पाठवून दंड भरून घेतला. सदरचे वाहने सोडण्यास हरकत नसल्याचा दाखला देऊन त्याबाबतचे अंतिम अधिकार प्रांत अधिकाºयांना असल्याने त्यांच्याकडे अहवाल पाठविला. परंतु गेल्या तीन आठवड्यांपासून प्रांत कार्यालयाकडून सदरचे वाहने सोडण्यास टाळाटाळ केली जात आहे.वाहनचालक हैराणलाखो रुपयांचा दंड भरूनही वाहन ताब्यात मिळत नसल्याने वाहनचालक दररोज कार्यालयाचे उंबरे झिजवित असून, लक्ष्मीपूजन तोंडावर आल्याने त्यांना त्यांची वाहने पूजा करण्यासाठी ताब्यात हवी आहेत. वाहने न सोडण्याबाबतचे कोणतेही ठोस कारण तहसील, प्रांत कार्यालयाकडून दिले जात नसल्याने वाहनचालक हैराण झाले असून, अशा प्रकारची वाहने अडविण्यामागे त्यांचा काही ‘हेतू’ आहे, अशी शंकाही बोलून दाखवित आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक