शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

विंचूरच्या शेतकऱ्याला लाखोंना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 00:37 IST

विंचूर : जिल्ह्यात द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. येथील ज्ञानेश्वर दत्तू जाधव या शेतकऱ्याला द्राक्ष व्यापाऱ्याने अडीच लाखांना गंडावले असून, याप्रकरणी शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. येथील ज्ञानेश्वर जाधव या शेतकऱ्याकडून पंजाब येथील अमितकुमार अर्जुनदेव या व्यापाऱ्याने अडीच लाखांच्या वर द्राक्ष माल घेऊन फसवणूक केल्याने तरुण शेतकरी संकटात सापडला आहे.

ठळक मुद्दे पोलिसांत तक्रार : परिसरातील अन्य जणांचीही फसवणूक

जाधव यांच्या शेतातील थॉमसन हा द्राक्षमाल तयार असताना पंजाब येथील व्यापारी अमितकुमार अर्जुनदेव यांनी शेतात येऊन सौदा करून २८५० रु. क्विंटल या दराप्रमाणे द्राक्षमाल उचलला होता. अमितकुमार याने एकूण दोन लाख ५४ हजार ६२ रुपयांचा धनादेश जाधव यांना दिला. मात्र धनादेश बँकेत जमा केला असता परत आला. व्यापाऱ्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता मोबाइल बंद आला. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनीही संबंधित व्यापाऱ्याला द्राक्षमाल दिला होता. त्यांनीही संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. व्यापाऱ्याबरोबर अन्य एका स्थानिक व्यक्तीने पैशाची हमी दिली असल्याने त्याच्याशी संपर्क केला असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने जाधव यांनी पोलिसांत धाव घेतली. संबंधितांची चौकशी करून शेतमालाचे पैसे मिळावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पूर्ण वर्षाची कमाई गेल्याने औषध दुकानदाराचे तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.दिघावकर यांच्याकडे तक्रारजाधव या शेतकऱ्याची परराज्यातील व्यापाऱ्याकडून फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांमधून संतापाचे तसेच भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी शेतकऱ्याने विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापकुमार दिघावकर यांच्याकडेही तक्रार केली आहे. याच व्यापाऱ्याने परिसरातील अन्य शेतकऱ्यांकडूनही द्राक्षमाल घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे समजते. संबंधित व्यापाऱ्यावर गोंदेगाव येथील शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोठ्या कष्टाने व अपेक्षेने द्राक्षबाग उभी केली होती. आर्थिक फसवणूक झाल्याने औषध दुकानदाराचे व बँकेच कर्ज कसे फेडावे हा मोठा प्रश्न आहे. संबंधितांची चौकशी करून माझे पैसे मिळावे हीच अपेक्षा आहे.- ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, विंचूर

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती