शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्या बंदमुळे लाखो बालके पोषण आहाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:34 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची उपाययोजना म्हणून शासनाने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्याचाच भाग म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली तर अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्याचा धोका ओळखून त्यादेखील बंद करण्याचा

ठळक मुद्देकोरोनामुळे कुपोषणाची शक्यता : शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५२८२ अंगणवाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे पाच हजार अंगणवाड्यांमधील सव्वातीन लाख बालके गेल्या दोन दिवसांपासून घरीच असून, यात कुपोषित बालकांचाही समावेश आहे. मुळातच कुपोषण व त्यात पोषण आहार बंद झाल्यामुळे या बालकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून, अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही आदेश आले नसल्याने एकात्मिक बाल विकास विभागही हतबल झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची उपाययोजना म्हणून शासनाने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्याचाच भाग म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली तर अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्याचा धोका ओळखून त्यादेखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपाययोजनांमुळे ग्रामीण भागात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात मदत होत असली तरी, अंगणवाड्यांमधील बालकांची मात्र हेळसांड होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५२८२ अंगणवाड्या असून, त्यात सुमारे सव्वा तीन लाख बालके दाखल आहेत. या बालकांना सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत अंगणवाडी सेविकांमार्फत आरोग्याची काळजी, पोषण आहार दिला जातो. मुख्यत्वे करून या अंगणवाड्यांमध्ये ग्रामीण भागातील व त्यातल्या त्यात आदिवासी भागातील कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक आहे. कुटुंबाकडून बालकांचे आरोग्य व उदरभरणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या बालकांच्या आरोग्याची काळजी म्हणून अंगणवाड्यांच्या माध्यमातून त्याचे पोषण केले जात आहे. तथापि, गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंगणवाड्या बंद करण्यात आल्याने बालकांना त्यांच्या घरीच ठेवण्यात आले आहे. काही बालकांचे आई-वडील दिवसा शेतीकामासाठी बाहेर जात असल्यामुळे या बालकांच्या पोषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना पोषण आहार व वैद्यकीय औषधांपासूनही वंंचित रहावे लागत असून, त्यात कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठा आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत या बालकांना औषध पुरवठा केला जात असला तरी, पोषण आहार बंद झाल्याने या बालकांच्या प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद