शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांची कोट्यवधींची बांधकामे रखडली

By admin | Updated: March 7, 2017 01:06 IST

नाशिक : अंगणवाड्यांची कामे रखडण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलन कांबळे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे वृत्त आहे

 नाशिक : कोट्यवधी रुपयांचे अनुदान प्राप्त असूनही सुमारे पाच ते सात कोटी रुपयांच्या अंगणवाड्यांची कामे रखडण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलन कांबळे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे वृत्त आहे. इतकेच नव्हे तर निविदा लिपिक अमित आडके यालाही निलंबनाची कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे समजते.कार्यकारी अभियंता मिलन कांबळे यांच्या वाहनाला मुंबई - आग्रा महामार्गावर अपघात झाल्याने तेव्हापासून मिलन कांबळे रजेवरच होते. दरम्यानच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अखर्चित निधीबाबत आढावा बैठकीतून माहिती घेतली असता बांधकाम विभाग दोनकडील १५३ अंगणवाड्यांच्या कामांपैकी अवघ्या ७५ ते ८० अंगणवाड्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे आढळले. तसेच ७३ कामांचे सुमारे पाच ते सात कोटींच्या अंगणवाड्यांची बांधकामे बांधकाम विभाग दोनकडे प्रलंबित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचवेळी काही मक्तेदारांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेच आम्हाला अंगणवाड्यांची कामे मिळालीत मात्र त्यासाठीच्या कार्यारंभ आदेश मिळत नसल्याची तक्रार केली होती. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांना सोबत घेत बांधकाम विभाग दोनला भेट देत कार्यकारी अभियंता मिलन कांबळे व निविदा लिपिक अमित आडके यांच्या टेबलांची दप्तर तपासणी केली. त्यात ७३ अंगणवाड्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेश अद्यापही काढले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अपघातानंतर घाईगर्दीत रुजू होण्यास आलेल्या कार्यकारी अभियंता मिलन कांबळे यांना मिलिंद शंभरकर यांनी रुजू करून घेतले नाही.उलटपक्षी कोट्यवधींची कामे का रखडली, याबाबत विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच ही कामे हेतुपूर्वक प्रलंबित ठेवली का? कामे प्रलंबित राहिल्याने तुम्हाला निलंबित करण्यात का येऊ नये? अशी नोटीस लिपिक अमित आडके यांना बजावली आहे. अमित आडके यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)