शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुक्कुटपालन व्यवसायातून महिला शेतकऱ्याची लाखोची उलाढाल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:19 IST

यशकथा : सुरुवातीला छोट्या प्रमाणावर असलेल्या व्यवसायाने आता मोठे रूप धारण केले असून, आज त्यांची वार्षिक उलाढाल किमान ८ ते ९ लाख रुपये इतकी आहे.

- आकाश गायखे  (नाशिक) 

शेतीमधून मिळणारे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नाही हे बघून त्यांनी पतीसमोर शेतीव्यवसायाबरोबर जोडधंदा करण्याची कल्पना मांडली. इतकेच नव्हे तर त्यासाठी कष्ट करण्याची तयारीही दाखविली. पतीनेही त्यांच्या कल्पनेचे आनंदाने स्वागत केले आणि सुरू झाला पोल्ट्री व्यवसाय. सुरुवातीला छोट्या प्रमाणावर असलेल्या व्यवसायाने आता मोठे रूप धारण केले असून, आज त्यांची वार्षिक उलाढाल किमान ८ ते ९ लाख रुपये इतकी आहे. ही यशोगाथा आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील मनीषा भाऊसाहेब जाधव यांची.  

भाऊसाहेब जाधव हे शेती करतात. शेतीमधून मिळणारे उत्पन्न कमी असल्याने पतीची ओढाताण होते, हे त्यांची पत्नी मनीषा यांच्या लक्षात आले. त्यासाठी शेतीला जोड व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले.. विचारमंथनानंतर कुक्कुटपालन  व्यवसाय करण्याचा निर्णय झाला आणि १९९६ साली प्राथमिक स्तरावर त्यास सुरुवात केली. 

विविध ठिकाणी भेटी देऊन व्यवसायाची सखोल माहिती घेतली. मनीषा यांनी शासनाच्या पशुसंवर्धन केंद्राच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले. सुरुवातीस जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३ लाख रुपयांचे कर्ज घेत एकूण  सुमारे  ४ लाख रुपयांची गुंतवणूक करून ३१०० चौरस फूट जागेत शेड उभारले. सुरुवातीला २००० बॉयलर कोंबड्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केली.  कोंबड्यांचे चांगले संगोपन करून त्यांची विक्री केली असता त्यांना चांगले उत्पन्न मिळाले.

पहिल्या प्रयत्नाला आलेल्या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर व्यवसायाचा व्याप वाढविण्यास सुरुवात केली; मात्र २००२ मध्ये अचानक आर्थिक मंदीमध्ये अडकले. त्यावेळी त्यांनी १ रुपया किलोने कोंबड्यांची विक्री केली होती. त्यावेळी अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती;  परंतु  त्यांनी हार मानली नाही. कुटुंबाने दिलेला मानसिक आधार, इतर नातेवाईक व व्यापारी वर्गाने केलेली आर्थिक मदत या जोरावर मनीषा पुन्हा उभ्या राहिल्या, पुन्हा जोमाने व्यवसाय सुरू केला. आज मनीषा जाधव यांनी   २०,००० चौरस मीटर जागेमध्ये आणखी ४ शेड उभे करून २० हजार  कोंबड्यांचे  संगोपन  करत आहेत.

कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य घरी बनवण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करून त्यासाठी लागणारे यंत्र खरेदी केले आहे. घरच्या कोंबड्यांसाठी लागणारे खाद्य पुरवून आता त्या नाशिक शहर, मुंबई, ठाणे तसेच गुजरात येथेही कोंबडी खाद्य विक्रीसाठी पाठवतात. त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ८ ते ९ लाख रुपये इतके आहे. कोंबडी खताचीसुद्धा  त्या विक्री करतात.  पुढील काही दिवसात शेडची संख्या वाढवून सुमारे एक लाख कोंबड्यांचे संगोपन करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या कुक्कुटपालन व्यवसायामुळे स्थानिक बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. कुक्कुटपालन व्यवसायाकडे सकारात्मकतेने पाहिले तर खरोखरच हा फायद्याचा शेतीपूरक व्यवसाय असल्याचे मनीषा जाधव सांगतात. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी