नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील संसरी लेन येथील एका इमारतीत राहणाऱ्या मतिमंद मुलीवर त्याच ठिकाणी राहणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याने घरात बोलवून बलात्कार केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संसरी लेन येथील एका इमारतीमध्ये २३ वर्षीय मतिमंद युवती आपल्या कुटुंबीयांसह राहते. त्याच इमारतीत लष्करी अधिकारी कर्नल विनोद सहानी हेदेखील राहतात. गुरुवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास सहानी यांनी त्या मतिमंद मुलीस घरात बोलवून तिच्यावर बलात्कार केला. मतिमंद युवतीवर अत्याचार झाल्याचे तिच्या कुटुंबीयांच्या शुक्रवारी लक्षात आल्यानंतर त्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेऊन कर्नल सहानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयित कर्नल सहानी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते ३ महिन्यांनंतर सेवानिवृत्त होणार असल्याचे समजते. (वार्ताहर)
लष्करी अधिकाऱ्याचा मतिमंद मुलीवर बलात्कार
By admin | Updated: May 3, 2015 01:47 IST