शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारासाठी आदिवासींचे भर उन्हात नाशिक शहराकडे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 19:00 IST

पोटापाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्यामुळे आदिवासींना नाईलाजास्तव रोजगाराच्या शोधासाठी शहराजवळची खेडीची वाट धरावी लागते. परिणामी गिरणारेसारख्या भागात आदिवासींचे स्थलांतर होऊ लागले आहे. गिरणारे गाव शहर व आदिवासी भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काश्यपी धरणाचा परिसर असलेल्या गिरणारे गाव तसे कृषिसमृद्ध आहे.

ठळक मुद्देगिरणारे शिवाराला द्राक्ष बागायती शेती लाभलेली आहे गिरणारे गाव आदिवासी गाव, पाड्यांपासून तासाभराच्या अंतरावर

गिरणारे : वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील आदिवासी भागात रोजगाराचा प्रश्न बिकट झाला असून, शेती व शेती पूरक जोडधंदेही मंदावल्याने आदिवासींची शहरी भागासह जवळील खेड्यांच्या दिशेने भटकंती वाढत आहे. नाशिक पासून अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतरावर असलेल्या गिरणारे गावातील मजुरांच्या नाक्यावर आदिवासींचा वाढता ठिय्या त्याचे बोलके उदाहरण ठरत आहे.पावसाळ्याची चार महिने जिल्ह्यातील आदिवासी भाग जणू नंदनवनासारखाच भासतो. सर्वत्र भात, नागली, खुरसणी, भुईमूग यांसारख्या पिकांचे उत्पादन जोरात घेतले जाते. त्यामुळे स्थलांतराचा प्रश्न निर्माण होत नाही. आदिवासींच्या हाताला कामही मिळते आणि उत्पादनाचे प्रमाणही वाढलेले असते. पाणीटंचाईची समस्याही सुटलेली असते. त्यामुळे आदिवासी लोक पावसाळ्यात उंबरा ओलांडत नाही; मात्र उन्हाळ्यात परिस्थिती याउलट होते. पोटापाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्यामुळे आदिवासींना नाईलाजास्तव रोजगाराच्या शोधासाठी शहराजवळची खेडीची वाट धरावी लागते. परिणामी गिरणारेसारख्या भागात आदिवासींचे स्थलांतर होऊ लागले आहे. गिरणारे गाव शहर व आदिवासी भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काश्यपी धरणाचा परिसर असलेल्या गिरणारे गाव तसे कृषिसमृद्ध आहे. गिरणारे गाव आदिवासी गाव, पाड्यांपासून जसे तासाभराच्या अंतरावर आहे, तसे या गावातून नाशिक शहरात येण्यासाठी महामंडळाची बससेवेसह खासगी वाहतूक सेवाही उपलब्ध असल्यामुळे शहरासोबत हे गाव जोडलेले आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही. गिरणारे शिवाराला द्राक्ष बागायती शेती लाभलेली आहे. यामुळे या भागात द्राक्ष उत्पादकांची संख्या आहे. तसेच द्राक्ष काढणीनंतर मणुका तयार करणारे विविध व्यावसायिकांचाही येथे मुक्का दिसून येतो. यामुळे या भागात मजुरांची नेहमीच गरज भासते. काबाडकष्टाची कामे करण्यासाठी आदिवासी भागातील लोकांची मोठी मदत होते. एकूणच मजुरीसाठी गिरणारे भागात सध्या आदिवासींचा राबता दिसून येत आहे.--सरकारी उदासीनतेची ‘मनरेगा’आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे. दुर्गम आदिवासी गाव, पाड्यांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) विविध विकासकामे राबविली जातात; मात्र तरीदेखील तुटपुंजे मजुरी, अल्प विकासकामांमुळे ‘मनरेगा’मध्ये आदिवासींचे फारसे ‘मन’ रमत नाही. नाईलाजास्तव भटकंतीची वेळ ओढावते. त्यातच सरकारी अनास्थेचेही भर पडते. कारण अनास्थेमुळे विकासकामांना प्रत्यक्ष ‘मुहूर्त’ मिळण्यास विलंब होतो. परिणामी आदिवासींना ‘मनरेगा’मध्ये हाताला काम कमी प्रतीक्षा अधिक करावी लागते.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरNashikनाशिकMigrationस्थलांतरण