नाशिक : गिरणारे-मखमलाबाद रस्त्यावरून मखमलाबादकडे आपल्या कारने येत असताना कार उलटून झालेल्या अपघातात अनिकेत राजेंद्र ढबाळे (30, रा. गुलमोहरनगर म्हसरूळ) याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत.याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनिकेत हा त्याच्या मित्रांसोबत रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कारने येत असताना कर मातोरी गावाजवळ असलेल्या कॅनालरोडच्या पुलाला धडकून उलटली. या अपघातात अनिकेतच्या पायास व डोक्यास गंभीर मार लागला. त्यास त्याचा मित्र प्रवीण जाधव याने जिल्हा शासकीय रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. या अपघातात विक्र म धुमने (26, रा. दरी)चेतन आत्माराम मोरे (26 रा. दरी) यांना जबर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सूर होते.
म्हसरूळचा युवक अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:50 IST
नाशिक : गिरणारे-मखमलाबाद रस्त्यावरून मखमलाबादकडे आपल्या कारने येत असताना कार उलटून झालेल्या अपघातात अनिकेत राजेंद्र ढबाळे (30, रा. गुलमोहरनगर म्हसरूळ) याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत.
म्हसरूळचा युवक अपघातात ठार
ठळक मुद्दे याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सूर होते.