शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी अनुभवली शासकीय कामाची पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 01:01 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळोटी माथा, भेंडाळी येथील मुलांची क्षेत्रभेट निफाड तहसील कार्यालयात आणि पंचायत समिती पाहणी दौरा केला.

ठळक मुद्देसायखेडा : तहसीलदारांनी स्वखर्चाने दाखविला सिनेमागृहात तान्हाजी चित्रपट

सायखेडा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळोटी माथा, भेंडाळी येथील मुलांची क्षेत्रभेट निफाड तहसील कार्यालयात आणि पंचायत समिती पाहणी दौरा केला.दरम्यान यावेळी कार्यालय पाहत असताना तहसीलदार दीपक पाटील व विद्यार्थी यांच्यात संवाद सुरू होता. मुले अनेक प्रश्न पाटील यांना विचारीत होते. पाटील यांनी मुलांना तुम्हाला काय हवे आहे अशी विचारणा करताच त्यातील काही मुलांनी आम्हाला तान्हाजी सिनेमा पहायचा आहे, अशी इच्छा व्यक्त केली.क्षणाचाही विलंब न करता पाटील यांनी निफाड शहरातील रविराज सिनेमागृहात स्वखर्चाने मुलांना सिनेमा दाखवायला घेऊन गेले. मुलांसोबत बराच वेळ घालविला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळोटी माथा शाळेतील शिक्षक बाजीराव कमानकर व जयश्री पवार यांनी मुलांना शासकीय कार्यालये आणि तेथील कामकाज कसे असते हे दाखविण्यासाठी क्षेत्रभेट म्हणून निफाड तहसील कार्यालय आणि पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूसंपादन विभाग, वृत्तपत्र कार्यालय येथे अनोखी क्षेत्रभेट काढली.या उपक्र मासाठी शाळेला तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी संदीप कराड, गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, केंद्रप्रमुख ओंकार वाघ यांचे मार्गदर्शन मिळाले.तहसीलदार पाटील तहसीलदार होण्याअगोदर प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे एका शिक्षकातील विद्यार्थ्याप्रति असलेला भाव जागृत झाला व त्यांनी मुलांचे समाधान केले. एक वरिष्ठ अधिकारी अशा प्रकारे सहानुभूतीपूर्वक मुलांचा विचार करीत त्यांची इच्छा पूर्ण करतो असा आगळावेगळा अनुभव शिक्षक व कर्मचारी यांना आल्याने त्यांनी देखील समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत प्रशासनाची जबाबदारी सांगितली.हाळोटी माथा भेंडाळी या शाळेतील शिक्षक सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्र म राबवित असतात, क्षेत्रभेट निसर्गरम्य ठिकाणी न नेता प्रशासकीय कामकाजाची माहिती मुलांना व्हावी अशा ठिकाणी आणली आणि मुलांना प्रत्यक्ष अनुभूती दिली, मुलांनी अनेक प्रश्न विचारून कामकाजाची माहिती करून घेतली.- केशव तुंगार, गटशिक्षणाधिकारी, निफाड.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण