शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अ‍ॅपद्वारे ग्राहकांचे मीटर रिडिंग

By admin | Updated: February 17, 2017 00:10 IST

तंत्रज्ञान : ४५ हजार ग्राहकांची अ‍ॅपच्या माध्यमातून वीजजोडणी

 नाशिक : राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाइन सेवा मिळावी यासाठी महावितरणने तयार केलेल्या अ‍ॅपला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, या अ‍ॅपच्या माध्यमातून सुमारे दीड कोटी ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग घेण्यात आले आहे. महावितरणचे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांकरिता सध्या हे अ‍ॅप उपयुक्त ठरत असल्याचा दावा महावितरणने केला आहे. महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मोबाइल अ‍ॅप्सला चांगला प्रतिसाद मिळत असून केवळ सात महिन्यांत जवळपास १० लाख ग्राहकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे. या अ‍ॅपद्वारे आतापर्यंत १ कोटी ७० लाख ग्राहकांचे मीटर रिडिंग घेण्यात आले आहे. तसेच ७ लाख ४३ हजार ग्राहकांनी आपल्या वीज बिलांचा भरणा करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर केला असून सुमारे ४५ हजार ८१३ ग्राहकांना अ‍ॅप्सच्या माध्यमातून नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.या अ‍ॅपद्वारे नवीन ग्राहकांना वीजजोडणी अर्ज, वीजबिलांची माहिती व बिलांचा भरणा वीजसेवांविषयी तक्रारी व अभिप्राय इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय ज्या ग्राहकांचे मीटर रिडिंग घेण्यात आले नाही त्यांना अ‍ॅपद्वारे मीटर रिडिंग पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे अ‍ॅप महावितरण वेबसाइट, गुगल प्ले, अ‍ॅपल, विंडोज स्टोअर्स येथे उपलब्ध आहे.राज्यातील सुमारे ३८ हजारांपेक्षा अधिक तांत्रिक कर्मचाऱ्यांनी कर्मचारी मित्र अ‍ॅप डाउनलोड केले असून, याद्वारे नवीन वीजजोडणी, खंडित वीजपुरवठ्याबाबत एसएमएस, अचूक वीजमीटर रिडिंग, फिडर व डीटीसी मीटर रिडिंग आदि दैनंदिन कामे प्रभावीपणे केली जात आहेत. त्यामुळे महावितरणच्या कामकाजात अधिक गती आली आहे. (प्रतिनिधी)