शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पालिका आयुक्तांना भेटले अन् अवघ्या तासाभरात रस्त्यावरील अतिक्रमण हटले

By श्याम बागुल | Updated: April 27, 2023 19:26 IST

मध्यवर्ती भागात मोहीम : अतिक्रमण हटविण्यात सातत्य राखण्याचे आदेश

नाशिक - शहराची मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या सराफ बाजार, मेनरोड, रविवार कारंजा, शालीमार आदी भागात फेरीवाले, हातगाडी विक्रेते व रस्त्यावर बसतात. त्याच्यांकडून होणाऱ्या अतिक्रमणामुळे परिसरात पायी चालणेही कठीण होते. अशी तक्रार घेऊन सराफ व कापड विक्रेते महापालिका आयुक्तांना भेटले आणि अवघ्या तासाभरातच अतिक्रमण विभागाने मोहीम राबवून परिसर अतिक्रमणमुक्त केला. मात्र यात सातत्य राखण्याबरोबरच येत्या पंधरा दिवसांत पुन्हा या मोहिमेचा आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले.

शहरातील व्यापारी पेठेत दररोज शेकडो कोटींची उलाढाल होत असून, मात्र सीबीएस, शिवाजी रोड, सराफ बाजार, रविवार कारंजा, बोहोरपट्टी, धुमाळ पॉइंट ते दहीपूल, एम. जी. रोड या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने ग्राहकांना पायी चालणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे या परिसरात खरेदीसाठी येण्यास लोक कंटाळा करू लागल्याने त्याचा व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार सराफ असोसिएशन व कापड विक्रेत्यांनी गुरुवारी (दि.२७) महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेऊन केली. या भागातील अतिक्रमणाचा हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा असे साकडे घातले. यावेळी आयुक्तांनी तात्काळ अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे तसेच विभागीय अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना केल्या. अतिक्रमण मोहिमेत सातत्य असावे तसेच दररोज त्याबाबतचा अहवाल आपल्याला सादर केला जावा असे आदेश दिले.