शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पारा १२ अंशावर : आज नाशिककरांनी अनुभवली थंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 18:20 IST

मागील तीन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा १६ अंशावरून १२.१ अंशापर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे या तीन दिवसांत नाशिककरांना पहाटे तसेच रात्रीही थंडी अधिक जाणवण्यास सुरूवात झाली.

ठळक मुद्देकिमान तपमानाचा पारा १२.१ अंशापर्यंत नाशिककरांना पहाटे चांगलीच तीव्रता थंडीची जाणवली सध्या पहाटे थंडी चांगलीच अनुभवयास येत आहे.

नाशिक : हळुवारपणे थंडीचे शहरात आगमन झाले असून रात्री तसेच पहाटे गुलाबी थंडी नाशिककरांना जाणवू लागली आहे. कमाल तपमानाचा पारा तीशीच्या पुढे असल्याने सकाळी सात वाजेनंतर थंडीची तीव्रता अद्याप जाणवत नसली तरीदेखील बुधवारी मात्र नाशिककरांना पहाटे चांगलीच तीव्रता थंडीची जाणवली. वातावरणात गारठा निर्माण झाला होता. किमान तपमानाचा पारा १२.१ अंशापर्यंत घसरल्याने संध्याकाळी सहा वाजेनंतर हवेत गारवा निर्माण झाल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला.सोमवारी (दि.२९) १३.३ अंशापर्यंत पारा खाली आला. यावर्षी परतीच्या पावसाने ओढ दिल्यामुळे थंडीचे उशिरा व हळुवारपणे आगमन झाले आहे. नवरात्रोत्सवानंतर उन्हाचा चटका कमी होण्यास सुरूवात झाली. दसऱ्याचा सण पार पडताच रात्री वातावरणात गारवा जाणवू लागला होता. सध्या पहाटे थंडी चांगलीच अनुभवयास येत आहे. मात्र सात वाजता सुर्यकिरणे जमिनीवर येताच थंडी गायब होत आहे. कमाल तपमान अद्यापही तीशीच्यापुढे असल्यामुळे थंडीचा फारसा प्रभाव वातावरणात जाणवत नाही. सकाळी दहा वाजेनंतर उन्हाची तीव्रता नाशिककरांना दिवसभर अजूनही अनुभवयास येत आहे. आॅक्टोबरअखेर थंडीचे आगमन झाल्याने पुढील महिन्यात किमान तपमानाचा पारा अधिक घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोव्हेंबरचा पहिल्या आठवड्यात दिवाळी साजरी होत असल्याने वातावरणात काहीसा उष्मा टिकून राहण्याची शक्यता आहे; मात्र त्यानंतर थंडीचा कडाका वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. मागील तीन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा १६ अंशावरून १२.१ अंशापर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे या तीन दिवसांत नाशिककरांना पहाटे तसेच रात्रीही थंडी अधिक जाणवण्यास सुरूवात झाली. शनिवारी (दि.२०) किमान तपमानाचा पारा १९ अंशावर होता. या दहा दिवसांत किमान तपमानाचा पारा १३ अंशापर्यंत घसरला. यामुळे पुढील आठवड्यात किमान तपमानात अधिक घसरण होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमान