शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पारा ९.४ अंशांवरदिलासा : किमान तपमानात हळूहळू वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:53 IST

नाशिक : मागील आठवड्यापासून सातत्याने घसरणाºया शहराच्या किमान तपमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसापासून तपमानाचा पारा दहा अंशांच्या दिशेने वर सरकत असल्याने थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी (दि.१) किमान तपमान ९.४ अंश इतके नोंदविले गेले.डिसेंबरअखेर थंडीने नाशिककरांना तीव्र तडाखा दिला.

ठळक मुद्देशहराच्या किमान तपमानात हळूहळू वाढ.डिसेंबरअखेर थंडीने नाशिककरांना तीव्र तडाखा

नाशिक : मागील आठवड्यापासून सातत्याने घसरणाºया शहराच्या किमान तपमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. दोन दिवसापासून तपमानाचा पारा दहा अंशांच्या दिशेने वर सरकत असल्याने थंडीची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोमवारी (दि.१) किमान तपमान ९.४ अंश इतके नोंदविले गेले.डिसेंबरअखेर थंडीने नाशिककरांना तीव्र तडाखा दिला. कडाक्याच्या थंडीने नाशिककरांना हुडडुडी भरली होती. हंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद २९ डिसेंबर रोजी हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली होती. एकूणच पारा पाच अंशांच्या जवळपास पोहचल्याने नाशिककर थंडीच्या तीव्रतेमुळे बेजार झाले होते. निफाडचे तपमानही ६ अंशांवर घसरल्याने निफाडकरांनी धास्ती घेतली होती; मात्र किमान तपमानाचा पारा दोन दिवसापासून पुन्हा वर सरकत असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. थंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असल्याची आशा नागरिक व्यक्त करत आहे. जोपर्यंत किमान तपमानाचा पारा दहा अंशांच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत मात्र बोचºया थंडीची तीव्रता नागरिकांना चांगलीच जाणवणार आहे. रविवारी (दि.३१) पारा ९.२ अंशापर्यंत सरकला होता. सोमवारी पुन्हा दोन अंशांनी किमान तपमानात वाढ झाली. त्यामुळे लवकरच किमान तपमान दहा अंशांच्या पलीकडे जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निसर्ग लहरी असून, तो त्याचे रूप अचानकपणे बदलत असतो. त्याचा अनेकदा नागरिकांना प्रत्ययदेखील येतो आणि कधी कधी तर हवामान खात्याचे अंदाजही लहरी निसर्गापुढे फोल ठरतात. त्यामुळे हवामानाच्या स्थितीविषयी अंदाज बांधणेदेखील अवघड होते. मागील दोन ते तीन दिवसापासून किमान तपमानात हळूहळू वाढ होत आहे.