शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पारा १०.६ अंशावर : नाशिककरांना थंडीच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 21:02 IST

शहरात शनिवारी ८.८, रविवारी ९.२ तर सोमवारी ९.४ इतके किमान तपमान शहरामध्ये पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने नोंदविले आहे. दरम्यान, मंगळवारी पुन्हा पारा घसरल्याने थंडीची तीव्रता वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला होता.

ठळक मुद्दे. बुधवारी प्रथमच तपमानाचा पारा १० अंशाच्या पुढे . हंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद २९ डिसेंबरला झाली

नाशिक : शहराच्या किमान तपमानात बुधवारी (दि.३) पुन्हा वाढ झाली. तपमान १०.६ अंश इतके नोंदविले गेल्याने थंडीचा कडाका कमी झाल्याचे नाशिककरांना जाणवले. बुधवारी संध्याकाळीदेखील हवेत फारसा गारवा निर्माण झाल्याचे जाणवले नाही.मागील दोन दिवसांपासून शहराच्या किमान तपमानात वाढ होऊ लागली होती; मात्र अचानकपणे लहरी निसर्गाने रूप बदलले असून, मंगळवारी तपमान पुन्हा कमी होऊन पारा ८.२ अंशांपर्यंत घसरला; मात्र बुधवारी थेट दोन अंशांनी पारा वर सरकल्याने नाशिककरांना कडाक्याच्या थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला. पंधरवड्यापासून नाशिकचे किमान तपमान १० अंशाच्या खाली राहत असल्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली होती. बुधवारी प्रथमच तपमानाचा पारा १० अंशाच्या पुढे सरकल्याने नाशिककरांना बोच-या थंडीपासून काहीसा आधार मिळाला.शहरात शनिवारी ८.८, रविवारी ९.२ तर सोमवारी ९.४ इतके किमान तपमान शहरामध्ये पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राने नोंदविले आहे. दरम्यान, मंगळवारी पुन्हा पारा घसरल्याने थंडीची तीव्रता वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला होता. संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांनी स्वत:ला बंदिस्त क रून घेतल्याचे दिसून आले. पहाटेही थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत हवेत गारवा कायम होता; मात्र बुधवारी याविरुध्द स्थितीचा अनुभव नागरिकांनी घेतला. पारा अचानकपणे एका दिवसात दोन अंशांनी वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली. डिसेंबरअखेर थंडीने नाशिकक रांना तीव्र तडाखा दिला होता. कडाक्याच्या थंडीने नाशिककरांना हुडडुडी भरली होती. हंगामातील नीचांकी ७.६ अंश इतकी किमान तपमानाची नोंद २९ डिसेंबरला झाली होती.

टॅग्स :Nashikनाशिक