नाशिक : सावित्रीबाई फुले यांनी अनंत अडचणींना तोंड देत समाज सुधारणेचा वसा हाती घेतला. त्यात त्यांना महात्मा जोतिराव फुले यांची खंबीर साथ होती. त्यामुळे आज प्रत्येक महिलेच्या मागे पुरुषांनी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. समाज परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासून करणे गरजेचे असल्याचे मत मेटच्या विश्वस्त शेफाली भुजबळ यांनी व्यक्त केले.माळी समाज सेवा समितीच्या महिला मंडळाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच महिलामुक्ती दिनाचे औचित्य साधत समाजात उल्लेखनीय कार्य करणाºया महिलांचा सत्कार सोहळा गुरु वारी (दि.३) औरंगाबादकर सभागृह येथे पार पडला. त्यावेळी भुजबळ बोलत होत्या. पुढे बोलताना त्यांनी समाज बदलण्यासाठी कुटुंब व्यवस्था सुधारणे गरजेचे असून, त्याकाळात सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केल्यामुळे आज महिला पुरु षांच्या बरोबरीने काम करत असून, देशाच्या विविध महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार देवयानी फरांदे, नगरसेविका अर्चना थोरात, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, सहायक उपसंचालक पुष्पावती पाटील, सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा सोनवणे, माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तम तांबे, महिला समितीच्या अध्यक्ष मंगला माळी उपस्थित होती. आमदार फरांदे यांनी फुले दाम्पत्याचे कार्य महान आहे. त्यामुळे त्यांना सरकारने भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली. यावेळी माळी समाज सेवा समितीचे महिला मंडळाच्या अध्यक्ष मंगला माळी, उपाध्यक्ष संगीता अहिरे, सरचिटणीस चारु शीला माळी, लता राऊत, संध्या गिरमे, अरु णा पगार, सुशीला महाजन, आशा जाधव, मीनाक्षी मंडलिक, मंगला भरीतकर आदी उपस्थित होते.यांचा झाला सन्मानराजयोगिनीच्या नीता व पूनम, आदर्श शिक्षिका नलिनी अहिरे, मालेगावच्या ग्रामसेविका सुमित्रा गायकवाड, पी. एस. आय. भावना महाजन, कीर्तनकार अंजली शिंदे, सरपंच विनिता सोनवणे, पत्रकार शारदा कमोद, माजी नगरसेविका कविता कर्डक, अॅड. प्रेरणा देशपांडे, ओबीसी जनजागृती फोरमच्या संगीता पवार, अॅड. वृंदा कोल्हारकर, योगा तज्ज्ञ नूतन गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
महिलांच्या कार्यात पुरुषांनी साथ द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:47 IST
सावित्रीबाई फुले यांनी अनंत अडचणींना तोंड देत समाज सुधारणेचा वसा हाती घेतला. त्यात त्यांना महात्मा जोतिराव फुले यांची खंबीर साथ होती. त्यामुळे आज प्रत्येक महिलेच्या मागे पुरुषांनी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. समाज परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासून करणे गरजेचे असल्याचे मत मेटच्या विश्वस्त शेफाली भुजबळ यांनी व्यक्त केले.
महिलांच्या कार्यात पुरुषांनी साथ द्यावी
ठळक मुद्देभुजबळ : सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार