शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांच्या उद्यानरूपी स्मारकाला आली अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:29 IST

सशस्त्रक्रांतीचे पुरस्कर्ते आणि जाज्वल्य देशाभिमान असणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे उद्यानरूपी स्मारक साकारल्यानंतर भगूरकरांना झालेला आनंद क्षणिक ठरला.

विलास भालेराव ।भगूर : सशस्त्रक्रांतीचे पुरस्कर्ते आणि जाज्वल्य देशाभिमान असणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे उद्यानरूपी स्मारक साकारल्यानंतर भगूरकरांना झालेला आनंद क्षणिक ठरला. कालांतराने गावालगत दारणाकाठी असलेल्या या स्मारकाला अवकळा आली असून, भिकाºयांचे ते आश्रयस्थान बनले आहे. सावरकरांचे नाव घेऊन कारभार करणाºया सर्वच पक्षांच्या नेत्यांना त्यांचे विस्मरण होत असून, राज्य सरकारकडून निधी आल्यानंतरच स्मारकाचे काम मार्गी लागेल, असे सांगून कारभारी हात वर करीत आहेत.  भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मसमर्पण दिन सोमवारी (दि.२६) असून, त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे भगूरकर उद्यानाच्या अवस्थेमुळे अस्वस्थ होतात. भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वाडा असून, त्या जवळ दारणा नदीकाठी निसर्गरम्य असे हे उद्यान १९७७-७८ मध्ये साकारण्यात आले होते. त्यावेळी पां. भा. करंजकर हे नगराध्यक्ष होते. नाशिक नगरपालिकेतील अधिकारी विशेषत: मधुकर झेंडे यांच्या सारख्या अधिकाºयाची मदत घेऊन उद्यानात आकर्षक झाडे लावण्यात आली होती. त्याचप्रमाणे ज्येष्ठ विचारवंत शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याकाळी भगूरकरच नव्हे तर अनेकांना या उद्यानाच्या आठवणी स्मरतात. परंतु कालांतराने या उद्यानाकडे दुर्लक्ष होत गेले आणि ते लयास जाऊ लागले. त्यासाठी मध्यंतरी नवीन आराखडा तयार करण्यात आला. परंतु खर्चाचे नियोजन नसल्याने उद्यानाचे नूतनीकरण पूर्ण होऊ शकले नाही. दरवेळी भगूर नगरपालिकेच्या निवडणुका आल्यानंतर या उद्यानाचा मुद्दा उपस्थित केला जातो आणि निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर हा मुद्दा विस्मरणात जातो. वर्षभरापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळीदेखील स्थानिक नेत्यांनी सत्ता आल्यास सहा महिन्यांत उद्यानाचे काम सुरू झालेले दिसेल, असा शब्द दिला होता. मात्र, वर्ष उलटले तरी हालचाल नाही, उलट राज्य सरकारकडून निधी आला की काम सुरू होईल, असे सांगून हात वर केले जात आहे. उद्यानाची सद्यस्थिती गंभीर असून या जागेत अनेक भिकारी राहात आहेत. उद्यानात शोभिवंत झाडांऐवजी गाजर गवत वाढले आहे. अत्यंत अस्वच्छ असा हा परिसर असून एकेकाळी वर्दळ असलेल्या या उद्यानाकडे जाण्यासही भगूरकर धजावत नाहीत. ही स्थिती बदलावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक