शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सदस्यांनीच केले ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 16:21 IST

ढेकू खुर्द : दोघा सदस्यांविरुद्ध तक्रार

ठळक मुद्देतक्रार करुनही प्रशासनाकडून अद्याप काहीही कार्यवाही न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नांदगाव : नांदगाव तालुक्यातील ढेकु खु. येथील ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांनी ग्रामपंचायतीच्याच जागेवर अतिक्र मण केल्याची तक्रार करण्यात आली असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.सविस्तर वृत्त असे की, ढेकु येथील ग्रामपंचायत सदस्या सरलाबाई वाल्मिक सुर्यवंशी व त्यांचे पती वाल्मिक शहादु सुर्यवंशी यांनी स्वत:च्या मालकीच्या मिळकत क्र मांक १५७चे क्षेत्रफळ ३६० फुट इतके असून त्यांनी राजरस्त्यात ६५ फूट इतके अतिक्र मण करून नागरिकांचा सार्वजनिक वापराचा असलेला रस्ता बंद केला आहे. हे अतिक्र मण काढून नागरिकांना वापरासाठी रस्ता मोकळा करून देणेबाबत येथील माजी सैनिकाच्या मातोश्री रेशमबाई सजनराव सुर्यवंशी यांनी येथील सरपंच/ ग्रामसेवक यांच्या नावाने दि.२२ मार्च २०१९ रोजी अर्ज दाखल केला होता. दुसऱ्या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या सदस्या वैशाली कांतीलाल राठोड यांचे पती कांतीलाल काळु राठोड हे येथील माजी सरपंच असून त्यांनी शासकीय भूखंडावर अतिक्र मण करून ते सन २००५ पुर्वीचे जुने असल्याचे भासवून सदर जागेवर सिमेंटचे पक्के घराचे बांधकाम केल्याची तक्रार येथील उपसरपंच बळीराम भिमा चव्हाण व इतरांनी अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडे केली आहे. त्यांनी केलेल्या तक्र ारी अर्जासोबत माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार मिळालेल्या माहितीचे कागदपत्रे जोडली असुन, ग्रामपंचायत सदस्या वैशाली कांतीलाल राठोड यांचे पद रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे. तक्रार करुनही प्रशासनाकडून अद्याप काहीही कार्यवाही न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रामपालिकेच्याच सदस्यांनी अतिक्रमण केल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकEnchroachmentअतिक्रमण