शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

भुजबळ यांच्या मतदार संघावर मुनगुट्टीवार यांची मेहेरनजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 14:09 IST

रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या भरीव निधीतून येवला मतदार संघातील रस्त्यांचा मेकओव्हर होणार आहे तसेच नागरिकांना दळणवळण अधिक सोयीचे होणार आहे. या सर्व रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार

ठळक मुद्देयेवला मतदार संघात रस्त्यांसाठी १०२ कोटीअर्थसंकल्पात तरतूद : भुजबळांचा पाठपुरावा

नाशिक : येवला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष पाठपुराव्यातून सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात १०२ कोटी ५२ लाख रूपयांच्या निधीस मंजूरी मिळाली आहे. त्यात प्रामुख्याने रस्त्यांच्या बळकटीकरणासाठीच हा निधी असून, त्यातून तालुक्यातील दळणवळण सुविधा अधिक चांगली होण्यास मदत होणार आहे.येवला तालुक्यातील मुखेड-जळगाव नेऊर-सातारे-पिंपरी-ठाणगाव-गुजरखेडे-बाळापुर ते राज्य महामार्ग ८ या रस्त्यासाठी २ कोटी ८० लक्ष रुपये; नाशिक-येवला- देशमाने ते मुखेड फाटा भाग या रस्त्यासाठी २ कोटी ४५ लक्ष रुपये; सावरगांव-धुळगाव-एरंडगाव-भिंगारे महालखेडा- दत्तवाडी-शिरवाडे-वाकदरोड या रस्त्यासाठी १ कोटी ९६ लक्ष रुपये; नाशिक-निफाड- येवला या रस्त्यातील येवला तालुक्यातील भागासाठी १ कोटी ६३ लाख रुपये; प्रमुख जिल्हा मार्ग ७२ या रस्त्यासाठी १४ कोटी २ लक्ष रुपये निधीच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. तसेच सावरगांव-धुळगाव-एरंडगाव-भिंगारे महालखेडा-दत्तवाडी-शिरवाडे-वाकदरोड या रस्त्यासाठी १ कोटी ३० लक्ष रुपये, धुळगाव-सातारे-पिंपळगांव लेप- जऊळके- शिरसगाव लौकी- शेळकेवाडी रोड या रस्त्यासाठी ८५ लक्ष रुपये, देशमाने-मानोरी-मुखेड-महालखेडा-निमगाव मढ-नाटेगांव रस्त्यासाठी ८० लक्ष रुपये, पाटोदा- सावरगाव-नगरसूल-वाईबोथी- भारम रोड या रस्त्यासाठी ६४ लक्ष रुपये, सावरगांव- भाटगांव- रायते- चिचोंडी-निमगाव मढ रस्त्यासाठी ६३ लक्ष रुपये निधीच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.निफाड तालुक्यातील लासलगाव रेल्वे स्टेशन येथील उड्डाणपूल किमी १९२ ते १७२ लासलगांव- विंचूर या रस्त्यासाठी ६९ कोटी ७६ लक्ष रुपये तसेच म्हसोबा माथा फाटा ते धारणगांव खडक ते सारोळेथडी या रस्त्यासाठी ५ कोटी ५० लक्ष रुपये अशा एकूण १०२ कोटी ५२ लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या भरीव निधीतून येवला मतदार संघातील रस्त्यांचा मेकओव्हर होणार आहे तसेच नागरिकांना दळणवळण अधिक सोयीचे होणार आहे. या सर्व रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती भुजबळ यांचे स्वीय सचिव बाळासाहेब लोखंडे यांनी दिली.

 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक