शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मनपा संपावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:04 IST

महापालिकेच्या म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या वतीने आयुक्तांना संपाची नोटीस बजावल्यानंतर आता येत्या १६ आॅगस्ट रोजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आहे. त्यातून काही प्रमाणात वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नाशिक : महापालिकेच्या म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या वतीने आयुक्तांना संपाची नोटीस बजावल्यानंतर आता येत्या १६ आॅगस्ट रोजी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आहे. त्यातून काही प्रमाणात वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी असे वातावरण निर्माण झाले असताना कर्मचारी संघटनांच्या वादाची झालर लागली होती. अतिताणामुळे कर्मचाºयांनी घर सोडून जाणे किंवा एका सहायक अधीक्षकाने आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलल्याने वातावरण अधिकच तप्त झाले होते. त्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटना एक झाल्या आणि त्यांना लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळाले होते. या कर्मचारी संघटंनी गेल्या दि. ८ आॅगस्ट रोजी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सभा घेऊन आयुक्ततुकाराम मुंढे यांना कामकाज सुधारण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर संप पुकारण्याचा इशारा दिला. मात्र, ही मुदत संपण्याच्या आतच गेल्या शुक्रवारी कर्मचारी सेनेने संपाची हाक दिली असून, प्रशासनाला नोटीस बजावण्यात आली आहेत. महापालिकेचे कर्मचारी तणावमध्ये असून, त्यांच्या कामाच्या वेळा अनिश्चित आहेत. तसेच कर्मचाºयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत भरती झालेली नाही. तसेच पदोन्नत्याही मिळालेल्या नाहीत. असे नोटिसीत म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर या संघटनेच्या पदाधिकाºयांना येत्या गुरुवारी (दि.२) मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे चर्चेला बोलविण्यात आले आहे.प्रशासनाचा दावामहापालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कर्मचाºयांच्या बहुतांशी मागण्या यापूर्वीच कार्यवाहीत आहेत. गेल्या काही वर्षभरापासून नोकरभरतीची मागणी होत असली आस्थापना खर्च कमी करण्यात येत असून, त्यामुळे भरतीचा मार्ग प्रशस्त होण्याची शक्यता आहे. पदोन्नतीच्या मागणीबाबत रोस्टर बिंदू निश्चित नाही ते अंतिम झाल्यानंतर पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागेल, असा प्रशासनाचा दावा आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाStrikeसंप