येवला : मागासवर्गीय, बहुजन व ओबीसी समाजाला न्याय हक्काची जाणीव करु न देणारे नेते छगन भुजबळ यांच्यावर सुडबूद्धीने अन्याय केला जात आहे. त्यांच्या वरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्यासाठी ३ आॅक्टोबर २०१६ रोजी संपूर्ण नाशिक व इतर जिल्ह्यातील भुजबळ समर्थकांनी नाशिक येथे मुकमोर्चाचे आयोजन केले आहे. त्याच मुकमोर्चाच्या नियोजनासाठी येवले येथील भुजबळ संपर्क कार्यालयात भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांची बैठक मंगळवार दि.२६ सप्टेबरला सकाळी ११वाजता संपन्न्न झाली. बैठकीत मुकमोर्चा संदर्भात अॅड. माणकिराव शिंदे, अंबादास बनकर, स्वाती सोनवणे, अकबर शहा, राजु पवार, सचिन सोनवणे, साहेबराव आहेर, मोहन शेलार, राजेंद्र भांडगे, साहेबराव मढवई, मुधुकर जेजूरकर, ज्ञानेश्वर दराडे, हुसेन शेख, प्रकाश वाघ, संतु पा. झांबरे, प्रविण गायकवाड, आदिंनी केले. समाज, पक्ष, नव्हे तर भुजबळ समर्थकांचा मुक मोर्चा असून येवले तालुक्यातील जनतेने मुक मोर्चाद्वारे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्वांनी आपआपल्या परिने मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन अॅड. माणकिराव शिंदे, अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, अरु ण थोरात यांनी येवले तालुक्यातील जनतेला या बैठकीत मार्गदर्शन करतांना केले.या बैठकीसाठी नाशिक येथुन मुधूकर जेजूरकर व नाशिक येथील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चाच्या नियोजना संदर्भात येवले संपर्क कार्यालयात २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.०० वा. नाशिक येथील भुजबळ समर्थक आमदार जयवंत जाधव, दिलीप खैरे व समता परिषद अध्यक्ष बाळासाहेब कर्डक येणार असल्याने तालुक्यातील भुजबळ समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन अॅड. माणकिराव शिंदे, अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, अरु ण थोरात व पंकज पारख यांनी केले आहे. (वार्ताहर)
येवल्यात छगन भुजबळ समर्थकांची बैठक
By admin | Updated: September 27, 2016 00:51 IST