शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

टाकेद येथे शाहीस्नान पर्वणीनिमित्त बैठक

By admin | Updated: October 13, 2015 22:36 IST

टाकेद येथे शाहीस्नान पर्वणीनिमित्त बैठक

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे होणाऱ्या शाहीस्नान पर्वणीसाठीच्या आयोजनाबाबत नुकतीच दुसरी बैठक संपन्न झाली.सोमवार, दि. २६ आॅक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेला वारकरी संप्रदायाचे शाहीस्नान होणार आहे. महंत डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीस आमदार राजाभाऊ वाजे, निवृत्ती महाराज संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबक गायकवाड, सरपंच बाळासाहेब घोरपडे, तुकाराम नांगरे, नरहरी मडके, रामचंद्र परदेशी, उपसभापती पांडुरंग पा. वारुंगसे, ट्रस्टी किशोरदास वैष्णव, पुंडलीकराव थेटे. पंचायत समिती सदस्य हरिदास लोहकरे, बाळासाहेब गाढवे, संपत काळे, कचरू पा. डुकरे, रतन पा. जाधव, मधुकर कोकणे. विक्रमराजे भांगे, भास्कर महाले आदि ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.शाहीस्न पर्वणीच्या दिवशी सकाळी नऊ वाजता टाकेद गावातून संत निवृत्तिनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची शाही मिरवणूक काढण्यात येईल. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, साधू-संत, मंहत सहभागी होणार आहेत.सर्वतीर्थ टाकेद हे रामायणकालीन तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी पूर्वी सिंहस्थाची चौकी होती. येथे रामभक्त भक्तराज जटायू यांना मोक्ष मिळालेला आहे. यासाठी मागील बारा वर्षांपूर्वी १०/१०/२००३ रोजी पर्वणी झाली होती. टाकेद पंचक्रोशीतील व जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्वांचाच सहभाग महत्त्वाचा होता. याही वेळेस तालुक्यातील व परिसरातील सर्वच शाही पर्वणीसाठी प्रयत्न करत आहेत. (वार्ताहर)