शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संवाद मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 15:41 IST

सिन्नर: तालुक्यातील खडांगळी येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नुकताच संवाद मेळावा संपन्न झाला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना होत असलेला आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास समजावून सांगितला.

सिन्नर: तालुक्यातील खडांगळी येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा नुकताच संवाद मेळावा संपन्न झाला.भारत दिघोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात व्यासपीठावर माजी उपसरपंच केशव कोकाटे. युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक खुळे, रंगनाथ कोकाटे, सुनील ठोक आदी उपस्थित होते.भारत दिघोळे यांनी शेतकऱ्यांना कांदा बियाणे टाकण्यापासून ते विक्री करण्यापर्यंत येत असलेल्या समस्या व त्यामुळे शेतकऱ्यांना होत असलेला आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास समजावून सांगितला. ज्या शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करायची असेल त्यांनी आता यापुढे कांदा बियाणे सुद्धा स्वतःच्या घरी तयार केले पाहिजे कारण अनेक शेतकऱ्यांची बियाणामध्ये फसवणूक झाली असून अव्वाच्या सव्वा दरात शेतकऱ्यांनी बोगस बियाणे खरेदी केली. रोप तयार करण्यापासून ते विक्री पर्यंत कांद्याला साधारण वीस रुपये प्रतिकिलो मागे खर्च येत असतो. परंतु कांद्याला हवे तसे बाजारभाव मिळत नाही. याविरुद्ध सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कांदा दर वाढीकरता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या पाठीशी एकजुटीने उभे राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. आतापर्यंत कोणीही कांदा उत्पादक शेतकऱ्याची दखल घेतली नाही. परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणे करता संघटना एकजुटीने लढा देईल असे आश्वासन दिघोळे यांनी उपस्थितांना दिले.मेळाव्यात सुनील बारकू ठोक यांची महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानिमित्त दिघोळे यांच्या हस्ते ठोक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कैलास ठोक, राजेंद्र कोकाटे, गिरीश ठोक, गोरख कोकाटे, रवी ठोक, लक्ष्मण कोकाटे, बाबुराव ठोक, गोपाळ ठोक, किरण ठोक, गणेश कोकाटे, दीपक खुळे, गणेश ठोक, योगेश ठोक, सोमनाथ कोकाटे, किशोर ठोक, उमेश खुळे, सुरेश खुळे, संजय खुळे, कृष्णा खुळे, केशव भोकनळ, ज्ञानेश्वर भोकनळ व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.कांद्याचे शास्त्र समजून घ्यावेकांदा पिकाचा उत्पादन खर्च कमी करणे व त्याची गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे.कांदा चाळीत जास्तीत जास्त टिकेल यासाठी त्याच्या साठवणुकीचे तंत्र शिकून शेतकऱ्यांनी कांद्याचे व्यवस्थापन करावे.-अशोक खुळे, तालुका अध्यक्ष कांदा उत्पादक युवा संघटना

 कांदा उत्पादक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने सुनील ठोक यांचा सत्कार करताना भारत दिघोळे. समवेत रंगनाथ कोकाटे व अशोक खुळे. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरFarmerशेतकरी