शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वाङ्मयीन विचारमंथन होण्यासाठी संमेलनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:13 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याची कल्पना खूपच चांगली आहे़ हल्लीच्या काळात साहित्य आणि साहित्याचे वाचक या संदर्भातील स्थिती फारशी समाधानकारक राहिलेली नाही. माध्यमांचे अतिक्रमण, साहित्याचा घसरता दर्जा आणि पुस्तकांपासून दूर चाललेला वाचकवर्ग यामुळे साहित्याच्या क्षेत्रात फारसे उत्साहाचे वातावरण दिसून येत नाही,

नाशिकमध्येसाहित्य संमेलन का व्हावे?अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याची कल्पना खूपच चांगली आहे़ हल्लीच्या काळात साहित्य आणि साहित्याचे वाचक या संदर्भातील स्थिती फारशी समाधानकारक राहिलेली नाही. माध्यमांचे अतिक्रमण, साहित्याचा घसरता दर्जा आणि पुस्तकांपासून दूर चाललेला वाचकवर्ग यामुळे साहित्याच्या क्षेत्रात फारसे उत्साहाचे वातावरण दिसून येत नाही, असे म्हटले जाते़ तरीही काही प्रमाणात आशादायक चित्र आहे असे म्हणता येईल, कारण वेगवेगळ्या विषयांवर नवनवीन पुस्तके निघत आहेत़ विशेषत: बालसाहित्य विषयावर वेगवेगळे कवी आणि लेखक लेखन करीत आहेत़ छोट्या-मोठ्या शहरांमधून वेगवेगळ्या पुस्तकांची प्रदर्शने लागलेली दिसतात़ यात तरुण वर्ग, महिला आणि बालवाचक यांच्या अभिरुचीच्या पुस्तकांना मागणी वाढली पाहिजे़ वाङ्मयीन विचारांचे आदान-प्रदान घडले पाहिजे़ विचारमंथन व्हायला पाहिजे यासाठीच नाशिकला संमेलन व्हावे़आजच्या काळात ग्रामीण, आदिवासी, पुरोगामी, युवक आणि बालसाहित्य संमेलने छोट्या-मोठ्या शहरात होत असतात़ परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे साहित्य क्षेत्रात मोठे मंथन घडून येते़ त्यामुळे आजच्या काळात लेखक, कवी आणि वाचक यांना काहीशी निराशाजनक वाटणारी परिस्थिती बदलण्यासाठी साहित्य संमेलन निश्चितपणे उपयुक्त ठरू शकते़ नाशिकला यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संमेलने झालेली आहेत़ त्यामुळे साहित्य चळवळीवर त्या-त्या काळात थोडाफार परिणाम झालेला आहे़ यासाठी कायमस्वरूपी साहित्य क्षेत्रात मोठे कार्य होण्यासाठी नाशिक शहरात आगामी काळात मोठेसाहित्य संमेलन होण्याची गरज आहे़ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या रूपाने ही संधी नाशिकला मिळू शकते़ यासाठी नाशिकने उत्तर महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीचे नेतृत्व केले पाहीजे, तरच या परिसरातील साहित्य चळवळ खऱ्या अर्थाने व्यापक होऊन तिला चांगला आकार प्राप्त होऊ शकेल, अशी खात्री वाटते़- उत्तम कोळगावकरसाहित्य संमेलनात विविध विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवाद होतात़ पुस्तकांचे स्टॉल लागतात़ या माध्यमातून प्रयत्न होताना दिसतात़ मराठी माणसांनी मराठी भाषेतली वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचली पाहिजेत, यासाठी लेखक-पुस्तक-वाचक मेळाव्यासारखे उपक्रम राबविले पाहिजेत़ वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य संमेलनांकडूनदेखील साहित्य क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा घडून येते. या चर्चांमधून समाजाला एकप्रकारे विधायक दिशा मिळू शकते.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक