शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीची बैठक अवघ्या पाच मिनिटांत गुंडाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 18:37 IST

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे यासाठी एका संचालकाच्या नातेवाइकाकडून ३ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी विद्यमान सभापती चुंभळे यांच्यावर गेल्या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. चुंभळेंवर लाचखोरीचा ठपका असल्याने

ठळक मुद्देसभापती पिंगळेंची हजेरी : सात संचालकांची निबंधकांकडे तक्रारउपसभापती युवराज कोठुळे आणि सचिव अरुण काळे यांच्यावर कारवाई करावी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या सोमवारी गणपूर्तीअभावी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची तहकूब केलेली बैठक गुरुवारी बोलाविण्यात आली खरी, मात्र या बैठकीला लाचखोरीचा ठपका असलेल्या सभापती शिवाजी चुंभळे यांनी हजेरी लावल्याने अवघ्या पाच मिनिटांत बैठक गुंडाळण्यात आली. बैठकीला चुंभळे आणि पिंगळे या दोन्ही गटांचे संचालक उपस्थित होते. पिंगळे गटाच्या संचालकांना बाजू मांडू न देता अधिकाराची गळचेपी केल्याने उपसभापती युवराज कोठुळे आणि सचिव अरुण काळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी गटाच्या सात संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांची भेट घेऊन केली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे यासाठी एका संचालकाच्या नातेवाइकाकडून ३ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी विद्यमान सभापती चुंभळे यांच्यावर गेल्या महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. चुंभळेंवर लाचखोरीचा ठपका असल्याने जिल्हा उपनिबंधकांनी लादलेल्या निर्बंधांमुळे धोरणात्मक व आर्थिक व्यवहारासंबंधी कामकाजात सहभागी करून घेऊ नये, असे पत्र बाजार समिती सचिवांना दिले होते आणि कामकाजात सहभागी झाले तर त्याची जबाबदारी सचिवांवर राहील, असे पत्रात नमूद केले होते. त्यावर चर्चा करण्यासाठी गेल्या सोमवारी उपसभापती कोठुळे यांनी तातडीची बैठक बोलावली होती. चुंभळे यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांचे सह्यांचे अधिकार काढल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली खरी मात्र स्वत: कोठूळे व अन्य काही संचालक गैरहजर राहिल्याने बैठक तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब बैठक गुरुवारी सकाळी अकरा वाजता झाली. या बैठकीस दोन्ही गटांचे संचालक उपस्थित होते. उपसभापती कोठुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली त्यावेळी सभापती शिवाजी चुंभळेदेखील उपस्थित होते.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNashikनाशिक