मनमाड : येथील रेल्वे कारखान्यातील आॅल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा झोनल सचिव सतिश केदारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.सभेला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मोहन वारके , फादर सेबी कोरिया , प्रदीप गायकवाड, फरिोज शेख , सिध्दार्थ जोगदंड आदी उपस्थित होते. प्रारंभी सिद्धार्थ जोगदंड व प्रवीण अहिरे यांनी मागील वर्षाचा अहवाल सादर केला. कोरोनाच्या काळात जबाबदारी वाढली आहे.यावेळी रमेश पगारे, विजय गेडाम, रविद्र पगारे, सुभाष जगताप, संदिप पगारे, सुनिल सोनवणे, सागर गरूड, प्रमदीप खडागळे, किशोर खडागले, हर्षद सुर्यवंशी उपस्थित होते.
मनमाड रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:31 IST