शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी शांतता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:32 IST

मालेगाव मध्य : भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकसभा निवडणुकीचे काळात येत असल्याने आदर्श आचार संहितेचे पालन करीत जयंती उत्सव साजरा करावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शहर शांतता समितीची बैठक आज दुपारी पोलीस नियंत्रण कक्षात घेण्यात आली. यावेळी शहरात पोलिसांतर्फे करण्यात आलेल्या कारवाईबद्दल सार्वजनिक नागरी सेवा समितीच्या वतीने निलोत्पल यांचा सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देशहरात कोंबिंग आॅपरेशन राबवित मोठ्या प्रमाणावर हत्यारांसह शस्त्र हस्तगत करण्यात आली.

मालेगाव मध्य : भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती लोकसभा निवडणुकीचे काळात येत असल्याने आदर्श आचार संहितेचे पालन करीत जयंती उत्सव साजरा करावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शहर शांतता समितीची बैठक आज दुपारी पोलीस नियंत्रण कक्षात घेण्यात आली. यावेळी शहरात पोलिसांतर्फे करण्यात आलेल्या कारवाईबद्दल सार्वजनिक नागरी सेवा समितीच्या वतीने निलोत्पल यांचा सत्कार करण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाबरोबरच लोकसभा निवडणुकही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वत्र आदर्श आचार संहिता लागू आहे. त्यामुळे आंबेडकर अनुयायांनी आचार संहितेची उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. पारंपारिक निवडणूक मार्गावरूनच मिरवणूका काढण्यात यावी. मिरवणूक दरम्यान लहान मुलांकडे वाहने देण्यात येवू नये. कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही याची काळजी घ्यावी. उत्सवा दरम्यान गैरप्रकार कदापि खपवून न घेता कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन निलोत्पल यांनी केले.यावेळी कॅम्प विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजीत हगवणे, रामदास बोरसे, अरशद मिनानगरी, केवळ हिरे, भारत चव्हाण आदिंनी मनोगत व्यक्त केले.  बैठकीस शहर मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष पटाईत, गुलाब पगारे, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, मनपाचे व महावितरणचे अधिकारींसह शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.गत आठवड्यात विशेष पोलीस पथकाने हड्डी कारखान्यांवर केलेली कारवाई व शहरात कोंबिंग आॅपरेशन राबवित मोठ्या प्रमाणावर हत्यारांसह शस्त्र हस्तगत करण्यात आली. या दरम्यान राजकीय दबावाला बळी न पडता कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले. याबद्दल सार्वजनिक नागरी सुविधा सेवा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, सुनील चांगरे यांनी अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचा सत्कार केला.