सर्वतीर्थ टाकेद : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा आई ठकूबाई व वडील मुकेश सदगीर यांच्यासह शेणीत येथे जय बजरंगबली तालीम संघ, ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.सुवासिनींनी औक्षण करून सदगीर कुटुंबाचे स्वागत केले. आतषबाजी करत सजवलेल्या बैलगाडीतून हर्षवर्धन व आईवडिलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.शेणीत गावकऱ्यांच्या सदिच्छा आणि आशिर्वादमुळेच मी महाराष्ट्र केसरी हा किताब संपादन करू शकलो, असे हर्षवर्धन यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. गोरखनाथ बलकवडे, आमदार माणिक कोकाटे, विशाल बलकवडे आदींची भाषणे झाली. यावेळी आमदार माणिक कोकाटे, नाशिक जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष गोरखनाथ बलकवडे, बलकवडे व्यायामशाळेचे संचालक विशाल बलकवडे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रतन पाटील जाधव, पहिलवान रमेश कुकडे, राष्ट्रवादी इगतपुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, प्रताप ढोकणे उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जय बजरंगबली ग्रुप, रॉयल ग्रुप व ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले होते. सूत्रसंचालन तानाजी जाधव यांनी केले. आभार सचिन जाधव यांनी मानले.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेजीम नृत्य सादर केले. ठकूबाई सदगीर यांनी मनोगत व्यक्त केले. याच गावात माझा हर्षवर्धन कुस्त्यांचे धडे गिरवायला लागला. शेणीत ग्रामस्थांमुळेच भगूर येथील गोरखनाथ बलकवडे यांचे हर्षवर्धनला सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तो त्यांच्या तालमीच्या आखाड्यात शिकला, असे त्यावेळी म्हणाल्या.
हर्षवर्धन सदगीर यांची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:12 IST
महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा आई ठकूबाई व वडील मुकेश सदगीर यांच्यासह शेणीत येथे जय बजरंगबली तालीम संघ, ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.
हर्षवर्धन सदगीर यांची मिरवणूक
ठळक मुद्देशेणीत : आईवडिलांसह सत्कार