शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:21 IST

महापालिकेने अन्यायकारक, बेकायदेशीर लादलेल्या करवाढीविरोधात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या बैठकीत उच्च न्यायालयात रीट पिटीशन व जनहित याचिकाही दाखल करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकरोड : महापालिकेने अन्यायकारक, बेकायदेशीर लादलेल्या करवाढीविरोधात शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या बैठकीत उच्च न्यायालयात रीट पिटीशन व जनहित याचिकाही दाखल करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे.  मनपाने नाशिककरांवर अन्यायकारक व बेकायदेशीर करवाढ केल्याच्या निषेधार्थ ‘मी नाशिककर’ हे जनआंदोलन छेडण्यात आले होते. त्या आंदोलनाची आगामी रूपरेषा ठरविण्यासाठी जेलरोड येथील व्यापारी बॅँकेच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीच्या अध्यक्ष पदावरून बोलताना समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील आंदोलनामुळे मनपाच्या महासभेने करवाढ रोखण्याचा ठराव केला.तथापि, विधान परिषद निवडणूक आचारसंहितेचे कारण देत प्रशासकीय आदेश काढले नाहीत. उलट सामान्यांची वस्ती असलेल्या सिडकोतील वाढीव बांधकामे अतिक्रमित ठरवून ते पाडण्याचे आदेश दिले.  पावसाळ्यात निवासी घरे पाडण्यास प्रतिबंध असल्याने ही कारवाई ठप्प झाली असली तरी नंतर ती होणारच आहे. त्यामुळे समितीच्या वतीने सिडको तसेच शहरातील मळे विभागातील गुंठेवारी घरांच्या वाढीव बांधकामाबाबतच्या कारवाईला तीव्र विरोध करणार असल्याचे अरिंगळे यांनी सांगितले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष दत्ता गायकवाड व अन्य मान्यवरांनी आपली मते मांडली.शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटना, खासदार, आमदार, नगरसेवकांसह सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांशी चर्चा करून जनआंदोलन व्यापक करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात अला.  बैठकीला समितीचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, चिटणीस तानाजी जायभावे, उन्मेष गायधनी, गुरूमित बग्गा, गजानन शेलार, रमेश औटे, अ‍ॅड. भास्कर निमसे, दामोदर मानकर, शिवाजी म्हस्के, अ‍ॅड. मुकुंद आढाव, नितीन निगळ, मारूती मुठे, हरपालसिंग वाधवा, वामन दातीर, प्रभाकर पाळदे, उत्तम कोठुळे, रंजना बोराडे, वैशाली राठोड, प्रेमलता जुन्नरे, पुष्पलता उदावंत, प्रकाश बोराडे, सुरेश निमसे, दौलत त्रिभुवन, गोरख वाघ, विक्रम कोठुळे, शिवाजी हांडोरे, मधुकर सातपुते आदी उपस्थित होते.जनजागृती करणार  बैठकीमध्ये मनपाच्या करवाढीविरोधात नागरिकांच्या प्रभागनिहाय बैठका घ्यायच्या, महिलावर्गांमध्ये जनजागृती करून त्यांचा आंदोलनात सहभाग वाढवायचा, आयमा, वकील संघ, निमा, आयएमए, महाराष्ट्र चेंबर्स, शिक्षक, कामगार संघटना,  शिक्षण संस्थाचालक आदींच्या पदाधिकाºयांशी संवाद साधून त्यांना ‘मी नाशिककर’ या आंदोलनात सहभागी करून घ्यायचे. तसेच नाशिक बार असोसिएशन व महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या सल्ल्यानुसार करवाढीविरोधात रीट पिटीशन व जनहित याचिका दाखल  करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका