नगरसूल : येवला तालुक्यातील नगरसूल येथील नगरसुल ग्रामपंचायतीत प्रशासकी अधिकारी आनंद यादव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. पंचायत समिती उपसभापती अॅड. मंगेश जाधव, माजी सरपंच प्रसाद पाटील, सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील, व्यापारी संघाचे भाऊलाल कुडके, उध्दव निकम, नगरसूल दूरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. आर. सुरासे आदी उपस्थित होते.यावेळी गावात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सर्वप्रथम आठवडे बाजार बंद, भाजीपाला फळे विक्र ेते यांनी शुक्र वारी दुकाने बंद ठेवावे, गावातील सर्व व्यापारी वर्गाने दुकानदारांनी मास्क, सॅनिटायझर वापरणे आवश्यक, ग्राहकाला विना मास्कचे असल्यास किराणा व इतर साहित्य देता कामा नये व दुकानदारांनी दिलेल्या वेळेत दुकाने बंद न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.
नगरसूल येथे कोरोनाबाबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 18:25 IST
नगरसूल : येवला तालुक्यातील नगरसूल येथील नगरसुल ग्रामपंचायतीत प्रशासकी अधिकारी आनंद यादव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली.
नगरसूल येथे कोरोनाबाबत बैठक
ठळक मुद्देवेळेत दुकाने बंद न केल्यास कारवाई करण्याचा इशारा