शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्यापही नाही मिळाले डिसेंबरचे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:35 IST

नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्यापही डिसेंबर महिन्याचे वेतन मिळालेले नाही.

ठळक मुद्देजानेवारी महिन्याच्या वेतनालादेखील विलंब होण्याची चिन्हे

नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्यापही डिसेंबर महिन्याचे वेतन मिळालेले नाही.

त्या पार्श्वभूमीवर विलंब वेतनाबाबत आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांना निवेदन देऊन लवकरात लवकर वेतन उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली.महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना नाशिकच्या कार्यकारिणीच्या वतीने वेतनाच्या विलंबाबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोविड योद्धा म्हणून एकीकडे गौरविले जात असताना दुसरीकडे महिन्याचे वेतन वेळेवर होत नसल्याने कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. डिसेंबरचे वेतन जानेवारी संपुष्टात येत असतानाही मिळालेले नाही. तसेच या विलंबामुळे आता जानेवारी महिन्याच्या वेतनालादेखील विलंब होण्याची चिन्हे आहेत.

त्यामुळेच सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपसंचालक डॉ. गांडाळ यांना निवेदन देऊन पाठपुरावा करीत लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी डॉ. मोतीलाल पाटील, डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. युवराज देवरे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. प्रशांत खैरे, डॉ. पंकज जाधव, डॉ. अनंत पवार, डॉ. गिरीश देवरे, डॉ. तुषार देवरे तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल