शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय शिक्षण : अमित देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 01:38 IST

रशिया व युक्रेन या देशांतील युद्धामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी मदतीच्या दृष्टिकोणातून राज्य सरकार पंतप्रधानांसोबत राज्यपालांच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. यासंदर्भात आरोग्य विद्यापीठाने पुढाकार घेत मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी अभ्यासात्मक अहवाल सादर करण्याच्या सूचना करतानाच यासंदर्भातही व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आवाहन विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केल्या आहेत.

ठळक मुद्दे विद्यापीठाला अहवाल तयार करण्याच्या सूचना

नाशिक:  रशिया व युक्रेन या देशांतील युद्धामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी मदतीच्या दृष्टिकोणातून राज्य सरकार पंतप्रधानांसोबत राज्यपालांच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. यासंदर्भात आरोग्य विद्यापीठाने पुढाकार घेत मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी अभ्यासात्मक अहवाल सादर करण्याच्या सूचना करतानाच यासंदर्भातही व्हीजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आवाहन विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केल्या आहेत.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत सोहळा राज्यपाल तथा विद्यापीठचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (दि.२) ऑनलाइन पद्धतीने पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू तथा निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर आदी उपस्थित होते. यावेळी अमित देशमुख यांनी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचा लवकरच प्रारंभ होणार असल्याचे नमूद करतानाच आरोग्य शिक्षण व संशोधनासाठी आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संधी मिळणार असल्याचे अधोरेखित केले. आरोग्य शिक्षणातील सर्व विद्याशाखांचा समावेश असलेल्या ‘इंटिग्रेटेड मेडिकल कॉम्प्लेक्स’चाही समावेश यात करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.--

कोविड-१९ काळात आरोग्य विद्यापीठाने ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्ष परीक्षा घेऊन विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर आदर्श निर्माण केला. विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र होऊन समाज हिताच्या दृष्टिकोणातून सर्वच विद्याशाखांनी एकत्रित काम करणे आवश्यक आहे. - भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठAmit Deshmukhअमित देशमुख