शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त माध्यमकर्मींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:04 IST

नाशिक : राष्ट्रीय जाहिरात दिनाचे औचित्य साधून नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) व फेमा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि़१३) आयएमए सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वृत्तपत्रांमधील जाहिरात व संपादकीय विभागात विशेष काम करणाºया माध्यमकर्मींचा सत्कार करण्यात आला़ ‘लोकमत’च्या जाहिरात विभागाचे उपव्यवस्थापक श्रीनिवास पाठक यांचाही सत्कारार्थींमध्ये समावेश होता़

ठळक मुद्दे नावातर्फे आयोजन : माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा सन्मान

नाशिक : राष्ट्रीय जाहिरात दिनाचे औचित्य साधून नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) व फेमा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि़१३) आयएमए सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वृत्तपत्रांमधील जाहिरात व संपादकीय विभागात विशेष काम करणाºया माध्यमकर्मींचा सत्कार करण्यात आला़ ‘लोकमत’च्या जाहिरात विभागाचे उपव्यवस्थापक श्रीनिवास पाठक यांचाही सत्कारार्थींमध्ये समावेश होता़

१४ आॅक्टोबर हा दिवस राष्ट्रीय जाहिरात दिन म्हणून साजरा केला जातो़ शेतकरी वर्गाला सामोरे ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आनंद अ‍ॅग्रो ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक उद्धव अहिरे यांनी यावेळी सांगितले की, टीव्ही, आॅनलाइन वेब आवृत्त्यांच्या काळातही वृत्तपत्रातील जाहिरातींचे स्थान अबाधित आहे़ स्वातंत्र्यानंतर शेतीकडे सर्वच सरकारचे दुर्लक्ष झाले. १९६० ते १९६२ पर्यंत शेती क्षेत्राची अवस्था चांगली होती़ मात्र, त्यानंतर आलेल्या प्रत्येक सरकारच्या कालावधीत ºहास होत गेला़ सद्यस्थितीत प्रत्येक सरकार हे जाहिरातींवर सुरू असल्याचे सांगून शेतीतील ठिबक सिंचनासाठी जाहिरातींचा मोठा हातभार लागल्याचे सांगितले़

ज्येष्ठ ग्राफिक डिझायनर व ‘नावा’चे सदस्य श्रीकांत नागरे यांनी जाहिरात क्षेत्रातील ग्राफिक्स व डिझाइनचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले़ त्यामध्ये डिझाइन हा जाहिरातीचा आत्मा असून, सोपी व सुटसुटीत भाषा, शब्दरचना, फॉन्ट, रंगसंगती, छायाचित्र यामुळे जाहिरात उठून दिसते यामुळे परिणाम साधत असल्याचे नागरे यांनी सांगितले़ यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कारार्थींचा सत्कार करण्यात आला़

व्यासपीठावर फेमचे अध्यक्ष मोतीराम पिंगळे, नावाचे अध्यक्ष विठ्ठल देशपांडे, ‘देशदूत’चे कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे, ‘पुण्यनगरी’चे निवासी संपादक किरण लोखंडे, ‘टाइम्स’ समूहाच्या मंजिरी शेख उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल राजवाडे तर आभार विठ्ठल देशपांडे यांनी मानले़

‘नावा’तर्फे यांचा सत्कार‘लोकमत’च्या जाहिरात विभागाचे उपव्यवस्थापक श्रीनिवास पाठक, आनंद राईकर (देशदूत), नीलेश अमृतकर (दिव्य मराठी), सोमनाथ शिंदे (सकाळ), रुपेश शर्मा (महाराष्ट्र टाइम्स), जगदीश कुलकर्णी (पुण्यनगरी), रावसाहेब उगले (पुढारी), पंचवटीतील वृत्तपत्र विक्रेते मिलिंद धोपावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़

टॅग्स :Nashikनाशिक