शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

खुनांच्या तपासापेक्षा गुंतागुंत वाढविण्यात यंत्रणेला रस : गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:18 IST

महात्मा गांधींच्या खुनापासून नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश या सर्वांच्या खुनामध्ये एकाच यंत्रणेचा हात असल्याने खुनी सापडला तरी त्यांचा म्होरक्या सापडत नाही. या सर्व खुनांचा तपास करण्यापेक्षा त्यात गुंतागुंत वाढवण्यातच पोलीस आणि प्रशासनाला अधिक रस असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी केले.

नाशिक : महात्मा गांधींच्या खुनापासून नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश या सर्वांच्या खुनामध्ये एकाच यंत्रणेचा हात असल्याने खुनी सापडला तरी त्यांचा म्होरक्या सापडत नाही. या सर्व खुनांचा तपास करण्यापेक्षा त्यात गुंतागुंत वाढवण्यातच पोलीस आणि प्रशासनाला अधिक रस असल्याचे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांनी केले.परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित डॉ. दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत ‘महात्मा गांधी से गौरी लंकेश तक’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. गांधीजींच्या हत्येतही पिस्तुलाने गोळी चालवणारा गवसला, मात्र त्याच्यामागील सूत्रधारांना शिक्षा होऊ नये, अशीच त्या खुनाची अर्धवट चौकशी झाली. त्याचप्रमाणे डॉ. दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणांमध्ये साम्य असून, खुनी पकडले गेले तरी त्यांचे सूत्रधार मिळत नसल्याबाबत गांधी रोष व्यक्त केला. ज्या राष्टÑीय स्वयंसेवक संघाने या हत्या घडवून आणल्या आहेत, ते मात्र या सगळ्या हत्यांबद्दल नामानिराळे राहिले असल्याचा आरोपदेखील गांधी यांनी केला.हत्येमागील सूत्रधार बेपत्ताचदाभोलकरांच्या हत्येला सहा वर्ष उलटली तरी अद्यापही यंत्रणेला खरे सूत्रधार सापडलेले नाहीत. त्यामुळे आता या चारही हत्यांसाठी मिळून एक स्वतंत्र समितीच गठीत करण्याची मागणी करावी लागणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक