शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक चौकांबाबत वाहतूक शाखेकडून उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:53 IST

शहरातील प्रमुख रस्ते व अपघातप्रवण चौफुल्यांवर महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसविली आहे़ तर शहर पोलीस वाहतूक शाखा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याबरोबरच वाहतूक कोेंडी व अपघातप्रवण चौफुल्यांवर पोलीस कर्मचारी नियुक्त करते़

नाशिक : शहरातील प्रमुख रस्ते व अपघातप्रवण चौफुल्यांवर महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसविली आहे़ तर शहर पोलीस वाहतूक शाखा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याबरोबरच वाहतूक कोेंडी व अपघातप्रवण चौफुल्यांवर पोलीस कर्मचारी नियुक्त करते़ याबरोबरच शहरातील अपघाताच्या ठिकाणांची माहिती संकलित करून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणासोबत पत्रव्यवहार वा आवश्यक त्या उपाययोजना करतात़ मात्र, या व्यतिरिक्त शहरात असलेल्या अपघातप्रवण चौफुल्यांचा शोध घेऊन ‘लोकमत’ने अ‍ॅक्सिडेंट जंक्शन ही मालिका सुरू केली होती़ या मालिकेची वाहतूक शाखेने दखल घेतली असून, या चौफुल्यावर सिग्नल यंत्रणा तसेच विविध उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सांगितले आहे़  शहराच्या विस्ताराबरोबरच वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ शहरातील प्रमुख रस्ते व त्यावरील सिग्नल वगळता विविध ठिकाणी असलेल्या चौफुल्याही अपघातास कारणीभूत ठरत आहेत़ मात्र, किरकोळ अपघात होत असल्याने याकडे लक्ष दिले जात नाही़ लोकमतने ३ जुलैपासून सुरू केलेल्या अ‍ॅक्सिडेंट जंक्शन या मालिकेद्वारे अशा चौफुल्यांचा शोध घेत अपघाताची कारणे तसेच उणिवांवर प्रकाशझोत टाकला़ बहुतांशी चौफुल्यावरील अपघाताची कारणे ही वेगमर्यादेचे उल्लंघन, रस्ते निर्मितीनंतरच्या असुविधा, वाहतूक नियमांची पायमल्ली अशी विविध कारणे समोर आली़ तसेच काही ठिकाणी गतिरोधक तर काही ठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले़  शहर वाहतूक शाखेने शहरातील प्रत्येक अपघाताची माहिती डिजिटलाइज केली आहे़ लोकमतने सुरू केलेल्या मालिकेतही अपघात झालेल्या व होण्याची दाट शक्यता असलेल्या चौफुल्यांचा वेध घेऊन त्याबाबतची कारणमीमांसा करण्यात आली होती़ या मालिकेच्या माहितीचा वाहतूक शाखेस उपयोग होणार आहे़  या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी आवश्यकतेनुसार सिग्नल यंत्रणा, पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती वा उपाययोजनांबाबत अहवाल तयार करून संंबंधित यंत्रणांसोबत पत्रव्यवहार वा उपाययोजना केल्या जाणार आहेत.शहरातील अपघातप्रवण चौफुलीगंगापूर रोडजवळील इंद्रप्रस्थ चौक, मुंबई नाका सर्कल, रविवार कारंजा सर्कल, कॉलेजरोडवरील प्रा़ टी.ए़ कुलकर्णी चौक, मॉडेल चौक, सारडा सर्कल, द्वारका सर्कल, वडाळा नाका चौक, इंदिरानगरमधील सार्थक चौक, मखमलाबाद नाका चौफुली, ड्रिम कॅसल चौफुली, तारवालानगर चौफुली, मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रा चौफुली, कोणार्कनगर चौफुली, आडगाव नाका चौफुली, सिडकोतील राणेनगर चौफुली, विहितगाव लॅमरोड चौफुली या अपघातप्रवण आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस