लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील विविध भागात कोरोनाने आपले बस्तान बसवले असल्यामुळे यावर उपाययोजना म्हणून दिंडोरी तालुका आरोग्य विभागाकडून ठोस उपाययोजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती दिंडोरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोशिरे यांनी दिली.तालुक्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे बाधितांच्या संपर्कातील रग्ण व निकटवर्तीयांचा शोध घेण्यासाठी ट्रेस, ट्रिक, ट्रिट या त्रिसूत्रीचा वापर करून कोविड आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात येत आहे. दिंडोरी तालुक्यात सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६१९, कोरोना संशयित रुग्ण ३६२१ व सद्य:स्थितीत कोरोना रग्णसंख्या १३५ आहे. जनतेने जागरूक राहून खरी माहिती शासनाला द्यावी तसेच स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, यासाठी प्रत्येकाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन डॉ. कोशिरे यांनी केले आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी दिंडोरी तालुक्यात उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 18:40 IST
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील विविध भागात कोरोनाने आपले बस्तान बसवले असल्यामुळे यावर उपाययोजना म्हणून दिंडोरी तालुका आरोग्य विभागाकडून ठोस उपाययोजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती दिंडोरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोशिरे यांनी दिली.
कोरोनावर मात करण्यासाठी दिंडोरी तालुक्यात उपाययोजना
ठळक मुद्दे ट्रेस, ट्रिक, ट्रिट या त्रिसूत्रीचा वापर करून कोविड आटोक्यात आणण्याचा प्रयत्न