नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर महापौर ॲड. यतिन वाघ कार्यप्रवण झाले असून, गुरुवारी त्यांनी सिंहस्थ कामांचा पाहणी दौरा केला. शहरातील प्रमुख मार्गांचे रुंदीकरण करताना दुतर्फा झाडे लावून हरित मार्ग तयार करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे चौकही सुशोभित करण्यात येणार आहेत.गेल्या अनेक महिन्यांपासून पालिकेचे कामकाज ठप्प आहे. आचारसंहितेचा अडसर असल्याने महापौरांचे दौरेही बंद होते. गुरुवारी मात्र त्यांनी अधिकार्यांसमवेत दौरा केला. सातपूर येथील पपया नर्सरी, तेथून मुंबई नाका, सीबीएस, शरणपूररोड या भागातील रस्त्यांच्या कामांची पाहणी महापौरांनी केली. त्यांच्या समवेत शहर अभियंता सुनील खुने आणि अधीक्षक अभियंता उत्तम पवार हेदेखील होते. रस्त्यांची कामे करताना आता रस्ते आणि चौक सुशोभिकरणावर भर देण्यात येणार आहे. मुंबई नाका, सीबीएस, पपया नर्सरी असे अनेक चौक विकसित करण्यात येणार आहेत. तसेच प्रमुख मार्गांवर रस्त्याच्या दुतर्फा शोभिवंत वृक्ष लावण्यात येणार असून, वेगळ्या पद्धतीचे आकर्षक पथदीप बसविण्यात येणार असल्याचे महापौर ॲड. यतिन वाघ यांनी सांगितले...छायाचित्र आर च्या फोटोवर महापौर दौरा नावाने सेव्ह.. ओळी- त्र्यंबकरोडवर रस्ता आणि अन्य कामांची पाहणी करताना महापौर ॲड. यतिन वाघ. समवेत शहर अभियंता सुनील खुने व इतर अधिकारी.
शहरात हरित मार्ग होणार महापौरांचा दौरा : चौकही सुशोभित करणार
By admin | Updated: May 16, 2014 00:17 IST