शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

युतीचे महापौर दिवे अनेक घडामोडींनी चर्चेत

By admin | Updated: February 7, 2017 22:56 IST

युतीचे महापौर दिवे अनेक घडामोडींनी चर्चेत

इतिहास चाळतानामहापालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा बहुमताच्या समीप होते, परंतु त्यांना अपक्षांची मदत घ्यावी लागली. त्यामुळेच वसंत गिते हे युतीचे पहिले महापौर ठरले. दरम्यान, दुसऱ्या महापौरपदासाठी शासनाने आरक्षण काढल्यानंतर ते अनुसूचित जातीसाठी राखीव निघाले. त्यामुळे उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी भाजपा- शिवसेनेकडे अधिकृत नगरसेवक नव्हते अशातला भाग नाही. रुख्मिणी कर्डक भाजपाकडे, तर शिवसेनेकडे बेबीनंदा डगळे हे दोन दावेदार होते. परंतु महासभेत बहुमत मिळवण्याइतपत त्यांची क्षमता नव्हती, असे दोन्ही पक्षांत म्हणणे होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बहुमत नसताना नगरसेवकांची जुळणी करणेचे काम सोपे नव्हते. अशावेळी वसंत गिते यांचे कसब कामाला आले. त्यांच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ज्या अपक्ष अशोक दिवे यांनी त्यांना मदत केली, त्यात दिवे यांचे नाव पुढे करण्यात आले. दिवे- गिते जोडीने यश मिळवत युतीकडे महापौरपद कायम ठेवले आणि अशोक दिवे महापौर ठरले. अशोक दिवे यांचे पक्षीय संबंध अनेकदा वादग्रस्त ठरले. महापौर झाल्यानंतर त्यांनी कार्यालयाचे नूतनीकरण केले. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तसबीर अडगळीत टाकल्याचा त्यांच्यावर आरोप झाल्याने शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुखांनी महापालिकेच्या बाहेर आंदोलन केले. दिवे यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीतच तिजोरीच्या चाव्या मात्र कॉँग्रेसकडे गेल्या. शाहू खैरे स्थायी समितीचे सभापती झाले, त्यावेळी उभयतांमधील सूप्त संघर्षही चर्चेचा ठरला होता. दिवे यांच्या कारकिर्दीत महत्त्वाचे काम म्हणजे फाळके स्मारक आणि बौद्ध स्मारकाचा वाद सोडविला. दोन्ही गटांच्या मागण्या त्यांनी मान्य करून जोड स्मारक करण्याच्या विषयाला मंजुरी दिली. त्यामुळेच हा विषय मार्गी लागला.  - संजय पाठक