शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

नगराध्यक्षांची निवडणूक पुढच्या आठवड्यात

By admin | Updated: July 6, 2014 00:11 IST

नगराध्यक्षांची निवडणूक पुढच्या आठवड्यात

नाशिक : महापौर व नगराध्यक्षांच्या निवडीला देण्यात आलेली मुदतवाढ मागे घेण्यात आल्याने या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, शासनाने यासंदर्भात काढलेल्या आदेशाची मुदत शनिवारी संपुष्टात आल्याने पुढच्या आठवड्यात जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भगूर, सटाणा, इगतपुरी, येवला, नांदगाव व मनमाड या सहा नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची मुदत संपुष्टात आल्याने जिल्हा प्रशासनाने जून महिन्यातच त्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. परंतु तत्पूर्वीच राज्य सरकारने सहा महिन्यांची मुदतवाढ दिल्यामुळे यासंदर्भातील राजकीय हालचाली थंडावल्या होत्या. आता मात्र न्यायालयाने कानउघाडणी करताच, सरकारने ही मुदतवाढ मागे घेतल्याने पुन्हा इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच शासनाचे जिल्हा प्रशासनाला आदेश प्राप्त होऊन ५ जुलैनंतर कधीही या निवडणुका घेण्यात याव्यात अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सहा नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारनंतर या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. साधारणत: तीन दिवस अगोदर संबंधितांना त्याची नोटीस द्यावी लागते व त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी मुदत, त्याची छाननी, अपिलासाठी तीन दिवस, माघारीसाठीही एक दिवसाची मुदत द्यावी लागत असल्याने १४ जुलैनंतर निवडणूक होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.