नाशिक : महापालिका महासभेने भविष्यात उद्भवणारे जलसंकट लक्षात घेऊन आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याची सूचना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली असली तरी महापौर अशोक मुर्तडक यांनी मात्र पाणीकपातीच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. याउलट जुलै-आॅगस्टपर्यंत पाणी कसे पुरवायचे, याविषयी पालकमंत्र्यांनी नाशिकमध्ये जलतज्ज्ञांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी आणि एकदाचा सोक्षमोक्ष लावावा. त्यानंतरच पाणीकपातीबाबत पुनर्विचार करण्यात येईल, असे सांगत महापौरांनी पालकमंत्र्यांचाच चेंडू त्यांच्या कोर्टात पुन्हा टोलविला आहे.
पाणीकपातीवर महापौर ठाम
By admin | Updated: December 4, 2015 00:03 IST