शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांचे सीईओ थवील यांना पुन्हा अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 01:03 IST

स्मार्ट सिटीच्या कारभारावर टीका करतानाच नगरसेवकांनी लक्ष केलेले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना महापौर रंजना भानसी यांच्यासह सत्तारूढ भाजपाने पूर्णत: संरक्षण दिले आहे.

नाशिक : स्मार्ट सिटीच्या कारभारावर टीका करतानाच नगरसेवकांनी लक्ष केलेले कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना महापौर रंजना भानसी यांच्यासह सत्तारूढ भाजपाने पूर्णत: संरक्षण दिले आहे.गेल्या सोमवारी (दि.९) झालेल्या महासभेत महापौरांनी स्वत:च थवील यांच्या वादग्रस्त कारभारामुळे बदली करण्याचे आदेश दिले होते. परंतु मखमलाबाद येथील ग्रीन फिल्डच्या ठरावात मात्र त्यासंदर्भातील सर्व उल्लेखच वगळण्यात आला असून, त्यामुळे महापौरांनी पाठराखण केल्याचे स्पष्ट झाले आहे. स्मार्ट सिटीच्या परस्पर चालणारा कारभार आणि नगरसेवकांना अंधारात ठेवून राबविलेले जाणारे प्रकल्प नागरिकांना होणारा त्रास यामुळे नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या कारभारावर विशेष महासभा बोलविण्याची मागणी केली होती. महापौरांनी ती मान्य केली होती. मात्र, अशी कोणतीही विशेष महासभा बोलवली नव्हती. दरम्यान, सोमवारी (दि.९) स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने मखमलाबाद शिवारात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यासाठी महासभेवर प्रस्ताव होता. ही संधी साधून अनेक नगरसेवकांनी स्मार्ट सिटीच्या कारभारावर टीका केली.यावेळी थवील यांना महापालिकेकडून किती हिस्सा मिळाला त्याची आणि ज्या एका किलोमीटर रस्त्यासाठी कंपनीने २१ कोटी मोजले त्याची विकास आराखड्यातील नियोजित रुंदी किती होती हेदेखील सांगता आले नाही. साकारणार आहे विशेष म्हणजे कंपनीवर आणि व्यक्तिगत थवील यांच्यावर टीका होत असताना ते हसत होते. त्यामुळे नगरसेवक तर अधिकच संतप्त झाले. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी टीका करताना असाच प्रकार झाल्याने शिवसेनेचे नगरसेवक संतप्त झाले आणि त्यांनी थवील यांच्या बदलीची मागणी केली. त्यावर सभागृहनेता सतीश सोनवणे यांनी ती मान्य केलीच, परंतु स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनीदेखील ग्रीन फिल्ड प्रकल्प चांगला असला तरी चुकीच्या अधिकाऱ्याच्या हातून तो होणार नसल्याने ठरावातच तसा उल्लेख करू, असे सांगितले.शिवसेनेच्या आणि विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर महापौर रंजना भानसी यांनी मखमलाबाद येथे टीपी स्कीमसाठी इरादा जाहीर करण्याचा निर्णय देताना प्रकाश थवील यांच्यावर आयुक्तांनी कारवाई करावी तसेच त्यांची बदली करावी, असे आदेश दिले होते. मात्र, बुधवारी (दि.११) घाईघाईने हा ठराव करताना त्यात थवील यांची बदली करावी, असा कोणताही उल्लेख न करता त्यांना अभय दिले आहे. त्यामुळे महापौरांच्या भूमिकेविषयी उलट सुलट चर्चा होत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी