शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीपेक्षा नाशिक मतदारसंघात प्रचारात सर्वाधिक खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 18:11 IST

नाशिक मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असले तरी, त्यातही प्रमुख लढत हेमंत गोडसे, समीर भुजबळ, पवन पवार व माणिकराव कोकाटे या चौघांमध्ये आहे. उमेदवारांनी आपल्यापरीने प्रचारात आघाडी घेतली असून, त्यासाठी येणाºया खर्चाचा तपशील आयोगाला सादर केला आहे. त्यात कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर

ठळक मुद्देदमछाक : काहींचा लाखो खर्च, तर काही हजारांच्या घरात ग्रामीण भागातील प्रचारापेक्षा शहरी भागातच उमेदवारांना अधिक खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात पोहोचला असून, उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांना त्यांच्या प्रचारावर केला जात असलेला खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात उमेदवारांनी प्रचारावर केलेला खर्च पाहिल्यास ग्रामीण भागातील प्रचारापेक्षा शहरी भागातच उमेदवारांना अधिक खर्च करावा लागला आहे. नाशिक मतदारसंघातील सर्व प्रमुख उमेदवारांचा खर्च लाखाच्या घरात असून, दिंडोरीतही अशीच परिस्थिती आहे, परंतु नाशिकच्या उमेदवारांपेक्षा त्यांचा खर्च कमी आहे.

नाशिक मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असले तरी, त्यातही प्रमुख लढत हेमंत गोडसे, समीर भुजबळ, पवन पवार व माणिकराव कोकाटे या चौघांमध्ये आहे. उमेदवारांनी आपल्यापरीने प्रचारात आघाडी घेतली असून, त्यासाठी येणाºया खर्चाचा तपशील आयोगाला सादर केला आहे. त्यात कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी २० लाख ७३ हजार ७२० खर्च केला आहे, त्या खालोखाल अपक्ष माणिकराव कोकाटे यांनी १३ लाख २४ हजार ९५६ रूपये तर युतीचे हेमंत गोडसे यांनी ११ लाख, ४८ हजार ९३७ रूपये खर्च केला आहे. अन्य उमेदवारांनी सरासरी २५ हजार रूपये खर्च केला आहे. तर विनोद शिरसाठ व सिंधुबाई केदार या दोघांनी खर्चच सादर केलेला नाही. दिंडोरी मतदारसंघातून ८ उमेदवार नशीब अजमावित असून, त्यातील युतीच्या भारती पवार यांचा खर्च सर्वाधिक आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यात ७लाख, ४४ हजार ९२२ रूपये खर्च केले असून, त्या खालोखाल माकपाचे उमेदवार जिवा पांडू गावित यांनी ५ लाख, १४ हजार ७५१, तर आघाडीचे धनराज महाले यांनी ३ लाख, ५० हजार ५३१ रूपये खर्च केले आहेत. अपक्ष उमेदवारांमध्ये सर्वाधिक खर्च टी. के. बागुल यांनी दीड लाख रुपये केला आहे.नाशिक मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ शहरातीलच आहेत. अन्य तीन मतदारसंघ शहरी, ग्रामीण असे संमिश्र मतदारांचा समावेश आहे. दिंडोरी मतदारसंघ पूर्णत: ग्रामीण असून, त्याचा विस्तारही मोठा आहे. असे असूनही तेथून उमेदवारी करणाºया उमेदवारांचा निवडणूक प्रचारावरील खर्च कमी आहे. त्यामानाने शहरी मतदारसंघात उमेदवारांना निवडणूक खर्च अधिक करावा लागत आहे. अजून प्रचाराचे आठ दिवस शिल्लक आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक