शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मॅट’ने दणका दिलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 18:46 IST

२० फेब्रुवारी रोजी राज्याच्या महसूल मंत्रालयाने राज्यातील शेकडो उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यात काही अधिकारी बदलीला पात्र नसतानाही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा सोयीने अर्थ काढून विभागीय आयुक्तकार्यालय तसेच महसूल मंत्रालयातील अधिका-यांनी या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला

ठळक मुद्देउपरती : महसूल मंत्रालयाने आपलेच निर्णय फिरविले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : निवडणूक आयोगाने निवडणुकीचे काम पाहणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या नियम, निकषानुसार बदल्या करण्याचे आदेश दिलेले असताना त्यांच्या विपर्यास अर्थ काढून सोयीने बदल्यांचे प्रस्ताव तयार करून पाठविणारे विभागीय आयुक्त कार्यालय व महसूल मंत्रालयाला महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधिकरणाने सणसणीत चपराक लगावताच, बुधवारी महसूल खात्याने जवळपास सात तहसीलदार व पाच उपजिल्हाधिका-यांचे नव्याने नियुक्तीचे आदेश काढले असून, त्यात काही अधिकाºयांची प्रशासकीय कारणास्तवही बदली करण्यात आली आहे.

मॅटने दणका दिल्यानंतर बदली करण्यात आलेल्या अधिकाºयांमध्ये तहसीलदार स्वप्नील पवार (बीड), जे. डी. वळवी (बीड), डी. सी. मेंडके (जालना), गणेश राठोड (धुळे), आबा महाजन (धुळे), वैशाली हिंगे (जळगाव) व मिलिंद कुलकर्णी (जळगाव) यांचा समावेश आहे, तर उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी (जालना), लतीफ पठाण (नांदेड), सुनील यादव (लातूर) व ब्रिजेश पाटील (जालना) या चौघांचा समावेश आहे, तर जिल्हाधिकारी व निवडणूक अधिका-यांच्या प्रस्तावानेदेखील निवडणुकीच्या सोयीसाठी काही अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यात जालनाचे श्रीमती संगीता सानप व राज नंदकर या दोघांचाही समावेश आहे. महसूल मंत्रालयाने या बदल्यांचे आदेश जारी केल्यानंतर विनाविलंब या अधिका-यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे तर संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांनी त्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत. २० फेब्रुवारी रोजी राज्याच्या महसूल मंत्रालयाने राज्यातील शेकडो उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यात काही अधिकारी बदलीला पात्र नसतानाही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा सोयीने अर्थ काढून विभागीय आयुक्तकार्यालय तसेच महसूल मंत्रालयातील अधिका-यांनी या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. त्यासाठी अनेक अधिका-यांना ‘तडजोडी’साठी भाग पाडण्यात आले. त्यामुळे साहजिकच काही प्रामाणिक अधिकाºयांची गैरसोय झाल्यानंतर त्यांनी थेट मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटनेदेखील त्याची दखल घेत बाजू ऐकून घेण्याबरोबरच महसूल मंत्रालयाला गैरसोयीच्या व चुकीच्या बदल्या केल्याबद्दल धारेवर धरून ताश्ोरे ओढले होते. त्यामुळे अन्याय झालेल्या अधिका-यांच्या सोयीनुसार बदल्या करण्याचे आदेश महसूल खात्याला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बुधवारी महसूल विभागाने या अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिकElectionनिवडणूक