शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅट’ने दणका दिलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:33 IST

निवडणूक आयोगाने निवडणुकीचे काम पाहणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या नियम, निकषानुसार बदल्या करण्याचे आदेश दिलेले असताना त्यांच्या विपर्यास अर्थ काढून सोयीने बदल्यांचे प्रस्ताव तयार करून पाठविणारे विभागीय आयुक्त कार्यालय व महसूल मंत्रालयाला महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधिकरणाने सणसणीत चपराक लगावताच, बुधवारी महसूल खात्याने जवळपास सात तहसीलदार व पाच उपजिल्हाधिकाºयांचे नव्याने नियुक्तीचे आदेश काढले असून, त्यात काही अधिकाºयांची प्रशासकीय कारणास्तवही बदली करण्यात आली आहे.

ठळक मुद्देउपरती : महसूल मंत्रालयाने आपलेच निर्णय फिरविले

नाशिक : निवडणूक आयोगाने निवडणुकीचे काम पाहणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या नियम, निकषानुसार बदल्या करण्याचे आदेश दिलेले असताना त्यांच्या विपर्यास अर्थ काढून सोयीने बदल्यांचे प्रस्ताव तयार करून पाठविणारे विभागीय आयुक्त कार्यालय व महसूल मंत्रालयाला महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधिकरणाने सणसणीत चपराक लगावताच, बुधवारी महसूल खात्याने जवळपास सात तहसीलदार व पाच उपजिल्हाधिकाºयांचे नव्याने नियुक्तीचे आदेश काढले असून, त्यात काही अधिकाºयांची प्रशासकीय कारणास्तवही बदली करण्यात आली आहे.मॅटने दणका दिल्यानंतर बदली करण्यात आलेल्या अधिकाºयांमध्ये तहसीलदार स्वप्नील पवार (बीड), जे. डी. वळवी (बीड), डी. सी. मेंडके (जालना), गणेश राठोड (धुळे), आबा महाजन (धुळे), वैशाली हिंगे (जळगाव) व मिलिंद कुलकर्णी (जळगाव) यांचा समावेश आहे, तर उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी (जालना), लतीफ पठाण (नांदेड), सुनील यादव (लातूर) व ब्रिजेश पाटील (जालना) या चौघांचा समावेश आहे, तर जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकाºयांच्या प्रस्तावानेदेखील निवडणुकीच्या सोयीसाठी काही अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यात जालन्याच्या संगीता सानप व राज नंदकर या दोघांचाही समावेश आहे. महसूल मंत्रालयाने या बदल्यांचे आदेश जारी केल्यानंतर विनाविलंब या अधिकाºयांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे तर संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाºयांनी त्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत.मॅटनेदेखील त्याची दखल घेत बाजू ऐकून घेण्याबरोबरच महसूल मंत्रालयाला गैरसोयीच्या व चुकीच्या बदल्या केल्याबद्दल धारेवर धरून ताश्ोरे ओढले होते. त्यामुळे अन्याय झालेल्या अधिकाºयांच्या सोयीनुसार बदल्या करण्याचे आदेश महसूल खात्याला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बुधवारी महसूल विभागाने या अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.२० फेब्रुवारी रोजी राज्याच्या महसूल मंत्रालयाने राज्यातील शेकडो उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यात काही अधिकारी बदलीला पात्र नसतानाही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा सोयीने अर्थ काढून विभागीय आयुक्तकार्यालय तसेच महसूल मंत्रालयातील अधिकाºयांनी या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. त्यासाठी अनेक अधिकाºयांना ‘तडजोडी’साठी भाग पाडण्यात आले. त्यामुळे साहजिकच काही प्रामाणिक अधिकाºयांची गैरसोय झाल्यानंतर त्यांनी थेट मॅटमध्ये धाव घेतली होती.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार